'ओ मेरे दिल के चैन' ह्या गाण्या वरील हा रील तिने खास आपल्या प्रिय नवऱ्यासाठी बनवला आहे.

आपल्या पार्टनरसोबतच्या सेल्फी शेअर करणे हे त्याच्या विषयीचे प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग होता. जो आता जुना झाला आहे. आता फेमस गाण्यांवर रील शेअर करण्याचा जमाना आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने आपला नवरा अभिषेक जावकर सोबतचा एक रील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘ओ मेरे दिल के चैन’ ह्या गाण्यावरील हा रील तिने खास आपल्या प्रिय नवऱ्यासाठी बनवला आहे. प्रार्थनाने छोट्या पडदयावर पुनरागम केले आहे. अभिनेता श्रेयस तळपदे सोबतची ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे. पुनर्विवाहावर आधारित ही मालिका वेगळ्या विषयामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

हिरकणी फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थनाचा फ्रेश लाईम सोडा हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. ह्या दोघीही सध्या ह्या सिनेमाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहेत. हा सिनेमा प्रार्थनाचा नवरा अभिषेक जावकर दिग्दर्शित करणार आहे. त्याचा हा पहिलाच मराठी सिनेमा दिग्दर्शनाचा प्रयत्न असणार आहे. ह्या आधी तो निर्मिती क्षेत्रात काम करायचा. मिस्सिंग ऑन अ विकेंड हा हिंदी सिनेमा देखील त्यानेच दिग्दर्शित केला होता. प्रामुख्याने तेलगू आणि मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात तो सक्रिय असतो.

ती आणि ती, मितवा, कॉफी आणि बरंच काही, फुगे, मस्का, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, व्हाट्स अप लग्न अश्या अनेक सिनेमात प्रार्थना दिसली होती. इन्स्टाग्रामवर ती बरीच सक्रिय असते. आपले वेगवेगळे फोटो आणि रिल्स ती आपल्या चाहत्यां सोबत शेअर करायला ती अजिबात विसरत नाही. प्रार्थनाने शेअर केलेला हा रील पाहिला का तुम्ही? जर पाहिला असेल तर कसा वाटला तुम्हाला? कळवा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये.

https://www.instagram.com/reel/CTL9f7xF9yy/?utm_source=ig_web_copy_link