अभिनेत्री प्रार्थना बेहेेरे (फोटो -इन्स्टाग्राम हँडलवरून साभार )

आपल्या अभिनयासाठी आणि सध्या मराठी सिनेसृष्टीत फिटनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. प्रार्थनाचा जन्म गुजरातमध्ये स्थायिक झालेल्या  एका मराठी कुटुंबात झाला. तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात एक पत्रकार म्हणून केली होती. या  वेळी तिची भेट अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्याशी झाली. पुढे त्यांच्याच ‘रिटा’ या चित्रपटात प्रार्थनाने एक छोटी भूमिका केली. या नंतर प्रार्थनाने निर्माती एकता कपूर यांच्या ‘पवित्र  रिश्ता’ या मालिकेसाठी ऑडिशन दिली. या मालिकेत प्रार्थनाला अंकिता लोखंडे हिच्या लहान बहिणीची म्हणजे ‘वैशाली’ ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली.

या मालिकेनंतर २०१३ साली प्रार्थनाने ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या चित्रपटाद्वारे मराठी सिनेविश्वात पदार्पण केले. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कमाई करू शकला नाही. काही वर्षांनी प्रार्थना ‘९ एक्स झक्कास हिरोईन हंट’ या कार्यक्रमात सहभागी झाली. या कार्यक्रमाची विजेती होऊन  प्रार्थनाला ‘मितवा’ या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या दोघांसोबत मुख्य भूमिका करायला मिळाली. या चित्रपटाने प्रार्थनाला अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली. या नंतर प्रार्थनाने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले.

जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा – या चित्रपटात प्रार्थना बरोबर अभिनेता अभिजीत खांडकेकर हा मुख्य भूमिकेत आहे.

मितवा – ‘अवनी’ हे पात्र साकारत स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी यांच्या बरोबर प्रार्थनाने पुन्हा एकदा जवळपास दोन वर्षांनी सिनेविश्वात पदार्पण केले. या चित्रपटासाठी प्रार्थनाचे विशेष कौतुक झाले.

कॉफी आणि बरंच काही – हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. या चित्रपटात प्रार्थना बरोबर वैभव तत्ववादी मुख्य भूमिकेत दिसला. ही जोडी चाहत्यांना खूपच आवडली.

बायकर्स अड्डा

मिस्टर अँड मिसेस सदाचारी – कॉफी आणि बरंच काही नंतर प्रार्थना आणि वैभवने हे या चित्रपटात पुन्हा एकत्र दिसले.

फुगे – स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांचा मैत्रीवर आधारित असलेल्या या कॉमेडी चित्रपटात प्रार्थनाला मोहन जोशी, सुहास जोशी या दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली.

अनान

हॉस्टेल डेज

व्हॅट्स अप लग्न

लग्न मुबारक – सागर पाठक दिग्दर्शित या चित्रपटात प्रार्थना बरोबर संजय जाधव, अभिनेत्री संस्कृती बालगुडे हे मुख्य भूमिकेत आहेत..

मस्का – अनिकेत विश्वासराव, आणि चिन्मय मांडलेकर यांच्या बरोबरच्या या चित्रपटात प्रार्थनाला एका वेगळ्या धाटणीची भूमिका साकारायला मिळाली.

लव्ह यु जिंदगी

रेडिमिक्स

ती अँड ती – या चित्रपटात प्रार्थना बरोबर अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसतात. हा चित्रपट अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केला आहे.

अजिंक्य

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *