सोल्जर गर्ल, डिंपल गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे प्रीती झिंटा होय. प्रीती एक हुशार गुणी आणि सुंदर अभिनेत्री आहे. शाहरुख खानसोबतच्या ‘दिल से’ या सिनेमातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. दिल से या सिनेमासाठी तिला बेस्ट डेब्यू फीमेल ॲक्ट्रेसचा अवॉर्ड देखील मिळाला होता. आज या गोष्टीला तेवीस वर्ष पूर्ण झाली आहेत. म्हणून प्रीतीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिला पहिला अवॉर्ड मिळाला, त्या क्षणाची आठवण आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सोबतच तिने आपले निर्माते, दिग्दर्शक, सहकलाकार, प्रेक्षक, चाहते सर्वांचे आभार मानले आहेत. त्यांच्याशिवाय हा माझा प्रवास पूर्ण आणि इतका यशस्वी होऊ शकला नसता असे देखील तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
प्रीतीने अनेक मोठ मोठ्या मुव्हीमध्ये काम केले होते. मोठ मोठ्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत देखील तिने काम केले होते. दिल चाहता है, वीरझारा, सलाम नमस्ते, क्रिश, कोई मिल गया, क्या कहना, जानवर, मिशन काश्मीर, चोरी चोरी चुपके चुपके अशा अनेक सिनेमांमध्ये तिने वेगवेगळ्या भूमिका साकारून आपण एक सर्वोत्कृष्ट आणि सर्वगुणसंपन्न अभिनेत्री आहोत हे दाखवून दिले होते. त्याचप्रमाणे कल हो ना हो, कभी अलविदा ना कहना, दिल है तुम्हारा, अरमान, इश्क इन पॅरिस या काहीशा हटके विषयावर आधारित सिनेमांमध्ये देखील तिने काम केले होते. अशी ही धाडसी, बोल्ड, चुलबुली अभिनेत्री बॉलीवूडमधील एके काळची नंबर वन अभिनेत्री होती.
आपल्या संपूर्ण बॉलीवूड करिअरमध्ये तिला बऱ्याच कॉन्ट्रोव्हर्सीचा सामना करावा लागला होता. पण या सर्वावर मात करून ती धाडसाने आणि खंबीरपणे उभी राहिली. आयपीएलमध्ये प्रीती झिंटाची स्वतःची एक टीमदेखील आहे. आपण एक उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्कृष्ट बिझनेस वूमन देखील आहोत हे तिने सिद्ध केले आहे. आणि म्हणूनच एक स्ट्राँग ॲण्ड बोल्ड वूमनचं टायटल तिला आपसूकच मिळाले आहे. प्रीती झिंटाचे बरेच सिनेमे तुम्ही पाहिले असतील. त्यापैकी कोणता सिनेमा तुम्हांला आवडतो? कळवा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये.