अभिनेत्री प्रिया बापट (फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांची आवडती अभिनेत्री अर्थात प्रिया बापट. प्रिया आणि तिचा पती अभिनेता उमेश कामत या दोघांच्या केमिस्ट्रीला ऑफस्क्रिन असो किंवा ऑनस्क्रिन चाहते नेहमीच पसंती देतात. ही जोडी नेहमीच त्यांचे कपल गोल्स देत असते. सोशल मीडियावर हे दांम्पत्य चांगलंच सक्रिय आहे. प्रिया सतत तिचे विविध लूक्समधील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते, तर कधी पती उमेश कामतसोबतचे फोटोही ती शेअर करताना पहायला मिळते. नुकताच प्रियाने तिचा एक सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांनी पसंती दर्शवली असून भरभरुन कमेंटही केल्या आहेत.

प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. फोटोत तिने पांढऱ्या रंगाचा टॉप घातलेला दिसून येत आहे. या पांढऱ्या टॉपवर मस्त फुलांची डिझाईन ही पहायला मिळतेयं. तिच्या चेहऱ्यावर सुंदर नैसर्गिक भाव पहायला मिळत आहेत. कॅंडिड फोटो क्लिक केल्याचे दिसून येतेयं. मोकळ्या केसांमध्ये प्रियाचा लूक आणखीनच छान दिसत आहे. या फोटोमध्ये प्रिया खूपच गोड दिसतेयं. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनला लिहिलयं की, Embrace the glorious mess that you are..म्हणजेच तुम्ही जसे आहात तसे स्वत:ला स्विकारा..! अशा शब्दांमध्ये तिने हा फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तिचे कौतुक केले आहे.

आपला सोज्ज्वळ स्वभाव आणि दमदार अभिनयाच्या जोरावर प्रियाने रसिकांचे मन जिंकले आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करत प्रियाने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यानंतर तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्यानंतर डिजिटल माध्यमातही पदार्पण करत तिथेही तिने आपली ओळख मिळवली आहे. रंगभूमी, मालिका, चित्रपट आणि आता वेबसीरिज असा प्रियाचा प्रवास राहिला आहे. या सर्व माध्यमांद्वारे प्रियाने प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला.