साहो स्टार प्रभास नवीन सिनेमा घेऊन लवकरच आपल्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री पूजा हेगडे आणि प्रभास ह्यांची प्रमुख भूमिका असणारा राधे श्याम हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

साहो स्टार प्रभास नवीन सिनेमा घेऊन लवकरच आपल्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री पूजा हेगडे आणि प्रभास ह्यांची प्रमुख भूमिका असणारा राधे श्याम हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. पूजा आणि प्रभास दोघेही ह्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये सध्या व्यग्र आहेत. १४ जानेवारी, २०२२ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा एक रेट्रो लव्ह स्टोरी सांगणारा सिनेमा असणार आहे. असे ह्या सिनेमाच्या पोस्टरवरून कळते. आज जन्माष्टमी निम्मित ह्या सिनेमाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ह्या पोस्टर मध्ये पूजा पियानो वाजवताना दिसून येतीये आणि प्रभास तिच्या शेजारी उभा राहून अतिशय प्रेमाने तिच्याकडे पाहताना दिसून येतोय. फक्त एका पोस्टर वरूनच ह्या दोघांमधील ग्रेट केमिस्ट्री दिसून येतीये. त्यामुळे प्रभास आणि पूजाच्या चाहत्यांना ह्या सिनेमाची प्रतीक्षा आहेच.

साहो हा प्रभासचा पहिला हिंदी सिनेमा होता. बाहुबली ह्या सिनेमाने प्रभासला भारता बाहेरही प्रसिद्धी मिळवून दिली. एक प्रॉमिसिंग कलाकार म्हणून त्याच्याकडे पाहिले जाऊ लागले. बाहुबली ह्या सिनेमात त्याने अमरेंद्र बाहुबली आणि महेंद्र बाहुबली अशी दुहेरी भूमिका निभावली होती. दोन्ही भूमिकांना त्याने तोडीस तोड न्याय दिला होता.

मोहेंजोदारो ह्या सिनेमातून पूजाने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. ह्या सिनेमाला म्हणावे तसे यश मिळाले नसले तरी पूजासाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडे झाले. त्या सिनेमानंतर तिने हाऊसफुल्ल या सिनेमात काम केले. आपल्या पहिल्याच सिनेमात तिला हृतिक रोशन सोबत काम करण्याची संधी मिळाली होती. प्रभास आणि पूजाची प्रमुख भूमिका असणारा राधेश्याम ह्या सिनेमाची ह्या दोघांचे चाहते उत्सुकतेने वाट पाहात आहेत.