शास्त्रीय गायक राहुल देशपांडे (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार )

युवा पिढीतील लोकप्रिय शास्त्रीय गायक राहुल देशपांडे याने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. एरवी शास्त्रीय संगीत गाणारा राहुल आपल्याला या व्हिडीओमध्ये वेगळ्या ढंगात दिसला आहे. मोहम्मद रफी यांचे अजरामर ‘चौदहवी का चांद’ हे गाणं म्हणत राहुलने सर्वांना एक रोमँटिक ट्रीट दिली.

लॉकडाऊनच्या काळात राहुलने आपल्या चाहत्यांसाठी अनेक लाईव्ह सेशन केले. प्रत्येक वेळी चाहत्यांनी या सेशन्सला उत्कृष्ट प्रतिसाद दिला. या वेळी राहुलची मुलगी रेणुका हिच्या गाण्याला लोकांनी चांगली दाद दिली.

राहुल आपल्या सोशल मीडियावर असे वेगवेगळे प्रयत्न करत असतो. डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या गायकी आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या स्मरणात राहिलेल्या ‘कट्यार काळजात घुसलीया संगीत नाटकाचे पुनरुज्जीवन करताना वसंतरावांनी साकारलेली ‘खाँसाहेबयांची भूमिका राहुल याने नाटकातून साकारली होती.

गायन, नाटक यानंतर आता राहुल मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘मी वसंतराव’ या चित्रपटातून राहुल आपले आजोबा आणि ज्येष्ठ शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे यांची भूमिका साकारणार आहे. निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित हा जीवनपट या वर्षी प्रदर्शित होऊ शकतो.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *