रणवीर सिंह (फोटो - सोशल मीडियावरून साभार

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आपल्या फॅशन सेन्ससाठी ओळखला जातो. आपल्या विचित्र ड्रेसिंग सेन्समुळे प्रसिद्ध असणारा रणवीर पुन्हा एकदा अशाच अवतारात दिसून आला. कोरोनाची गांभीर्यता लक्षात घेता तो डोक्यापासून ते पायापर्यंत संपूर्ण सुरक्षित अंदाजात दिसून आला. एका डबिंग स्टूडियोच्या बाहेर तो दिसला (Ranveer Singh Spotted Outside The Dubbing Studio) होता. संपूर्ण निळ्या शेडच्या आऊटफिटमधील त्याचे हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.

रणवीर आपल्या कामाच्या निमित्ताने एका डबिंग स्टुडियोमध्ये आला होता. यावेळी तो एका निळ्या रंगाच्या ट्रॅकसूटमध्ये दिसून आला. यासोबत त्याने काळ्या रंगाचा चष्माही घातला होता. पायात त्याने राखाडी आणि काळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमधील शूज घातला होता. एवढेच नाहीतर त्याने क्रॉसचे चिन्ह असलेला डिझाईन मास्कसुद्धा घातला होता. त्याचे हे मास्क सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या आऊटफिटमध्ये रणवीर अजिबात ओळखू येत नव्हता.

रणवीरच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास लवकरच तो ‘८३’ या चित्रपटात दिसणार आहे. भारतीय क्रिकेट संघाने १९८३ साली पहिला विश्वचषक जिंकला होता. त्यावर आधारित हा चित्रपट असून यामध्ये रणवीर कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहेत. ८३ नंतर तो ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटात दिसणार आहे.

सध्या रणवीर आपल्या आगामी ‘सर्कस’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करत आहेत. असे सांगितले जात आहे की, हा चित्रपट शेक्सपियर यांच्या द कॉमेडी ऑफ एरर्स या नाटकापासून प्रेरित आहे. या चित्रपटात रणवीर दुहेरी भूमिका साकारणार आहे. याशिवाय रणवीर सूर्यवंशी या चित्रपटाच्या प्रदर्शनाचीही वाट पाहत आहे. यामध्ये त्याने केमियो केला आहे.