अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्याअगोदर तिने आपले नाव बदलले. 'अंकिता' हे तिचे टोपण नाव असून, या नावानेच आपल्याला ओळख मिळावी असे तिला वाटले असावे.(फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार )

गेल्या काही दिवसांपासून अंकिता लोखंडेबद्दलची वेगवेगळी माहिती आपल्या सामोर येत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अंकिताबद्दल निरनिराळ्या चर्चा रंगू लागल्या. अंकिता आणि सुशांत दोघेही पवित्र रिश्ताच्या सेटवर भेटले. दोघेही सहा वर्षे एकमेकांच्या अखंड प्रेमात बुडाले होते पण कालांतराने त्यांचे नाते संपुष्टात आले. सुशांतच्या अचानक जाण्याने अंकिताला मोठा धक्का बसला. ती या धक्क्यातून सावरत नाही तोच तिच्या बद्दलची एक नवी माहिती समोर आली.

तुम्हाला माहिती आहे का, की अंकिता हे तिचे खरे नाव नाही?  वाचून आश्चर्य वाटलं ना!

अंकिताचे खरे नाव ‘अंकिता ‘ नसून ‘तनुजा’ आहे. अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्याअगोदर तिने आपले नाव बदलले. ‘अंकिता’ हे तिचे टोपण नाव असून, या नावानेच आपल्याला ओळख मिळावी असे तिला वाटले असावे. अंकिताचे मित्र- मैत्रिणी तिला ‘अंकिता’  याच नावाने हाक मारतात.

अंकिताने नुकतेच ‘मणिकर्णिका’ या कंगना रणावतच्या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.

बॉलिवूडमध्ये कलाकारांनी नाव बदलायची ही काय पहिलीच वेळ नाही. श्रीदेवी, जॅकी श्रॉफ, अक्षय कुमार या सारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी आपली नावे पदार्पणापूर्वी बदलली आहेत.

१४ जूनला सुशांत सिंहने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. सुशांतच्या अचानक जाण्याने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याचे आणि अंकिताचे बरेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *