दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार )

सत्तर-ऐंशीच्या दशकातले  बॉलिवूडचे ‘चॉकलेट हिरो ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना काळाच्या पडद्याआड जाऊन काही महिने लोटले आहेत. तरीही त्यांच्या कुटुंबासाठी आणि चाहत्यांसाठी ते आठवणीत अजूनही जिवंत आहेत.

मुलगी रिद्धीमाला तिच्या वडिलांचे नसणे खूप जाणवते म्हणूनच वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या सोबतचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. नुकताच तिने एक असा फोटो शेअर केला आहे ज्यात आपल्याला लहानपणीचे खोडकर ऋषी कपूर बघायला मिळत आहेत.

या फोटोत आपल्याला दिसत आहे की रणधीर कपूर कुणाबरोबर तरी ड्रिंक एन्जॉय करत आहेत. हा फोटो बघताना असे वाटते की जणू एकप्रकारची स्पर्धाच रंगली आहे. या दोघांच्या मधोमध लहानगे ऋषी कपूर अडकले आहेत आणि त्यांनी विचित्र असा चेहरा केला आहे.  हा फोटो शेअर करताना रिद्धिमाने लिहिले आहे की, “हा आतापर्यंतचा सर्वात गोंडस फोटो आहे.”

अलीकडेच रिद्धिमाने आई नीतू कपूरचा वाढदिवस साजरा केला. तिने एक छोटीशी  पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमध्ये रणबीर कपूर, करण जोहर, रीमा जैन आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य हजर होते. या पार्टीचे काही फोटो व्हायरल झाले होते.

आपल्याला माहितीच आहे की, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रिद्धीमा आपल्या वडिलांच्या अंतिम दर्शनासाठी उपस्थित राहू शकली नव्हती. दोन दिवसांनी मूव्हमेंट पासचा बंदोबस्त झाल्यावर ती दिल्लीहून आपल्या मुलीसोबत मुंबईत आली.

ऋषी कपूर यांनी भूमिका साकारलेले लैला मजनू, रफूचक्कर, सरगम, कर्ज,चांदनी, हीना, खेल खेल में, अमर अकबर अँथनी, हम किसीसे कम नही, असे एकापेक्षा एक चित्रपट गाजले आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *