रिंकू राजगुरु (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरुने सोशल मीडियावर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती बंजारा आऊटफिटमध्ये दिसत असून या ड्रेसमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. रंगीबिरंगी ड्रेसमधील रिंकूचा हा अंदाज चाहत्यांना फारच आवडला आहे. तिचा हा बंजारा लूक अदा पाहून चाहते घायाळ होत आहेत. तिच्या या फोटोंवर अनेक कमेंट करत चाहते रिंकूचे आणि तिच्या लूकचे कौतुक करत आहेत.

रिंकूने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एकूण चार फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिच्या वेगवेगळ्या अदा पाहायला मिळत आहेत. रंगीबिरंगी ड्रेसवर साजेसे दागिने अशा अंदाजात रिंकू लाजवाब दिसत आहे. रिंकूने घातलेला हा बंजारा ड्रेस तिला बंजारा समाजाकडून भेट म्हणून मिळाला आहे. रिंकूचे हे फोटो चाहत्यांच्या फारच पसंतीस उतरत असून त्यावर ते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

रिंकू सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय राहत आहे. याद्वारे ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांशी संपर्कात राहत आहे. तिच्याद्वारे शेअर करण्यात येणाऱ्या फोटोंमुळेही ती फारच चर्चेत राहत आहे. कारण या फोटोत ती दिवसेंदिवस अधिकच ग्लॅमरस होत चालली असल्याचे दिसून येत आहे. तिचे हे फोटो पाहून हीच का ती सैराटमधली आर्ची ? असा प्रश्नही चाहत्यांना पडत आहे.

सैराट चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पाऊल ठेवणारी रिंकू त्यानंतर तिने अनेक चित्रपटाद्वारे आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. तिने आतापर्यंत ‘कागर’, ‘मेकअप’, ‘मनसु मल्लिगे’ या चित्रपटात काम केले आहे. त्यानंतर हंड्रेड’ या वेबसीरिजच्या माध्यमातून तिने डिजिटल विश्वात पदार्पण केले. तर आता लवकरच रिंकू ‘छूमंतर’ या चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच लंडनमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करून ती भारतात परतली आहे. त्यानंतर ती ‘झुंड’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रिंकू बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे.