सडक २ चित्रपटाचे पोस्टर ( फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

आलिया भट्ट, संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर अभिनित सडक २ या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी (११ ऑगस्ट) प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र, संजय दत्तची प्रकृती बिघडल्याने एका दिवसासाठी ट्रेलरचे प्रदर्शन लांबविण्यात आले. तर आज (बुधवारी) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. आतापर्यंत या ट्रेलरला ४४ लाखापेक्षा अधिक वेळा पाहण्यात आले. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ट्रेलरला लाईकपेक्षा अधिक डिसलाईक मिळाले आहेत. सडक २ चित्रपटाला आलेल्या प्रतिक्रियांना पाहून असे सांगता येते की, चाहते ट्रेलरमुळे आनंदी नाहीत.

बुधवारी सकाळी ट्रेलर प्रदर्शित होताच अनेक नेटकरी युट्यूबवर डिसलाईकचे चिन्ह दाबून आपली प्रतिक्रिया दिली. या ट्रेलरला आतापर्यंत १ लाखापेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत तर बावीस लाखापेक्षा अधिक डिसलाईक मिळाले आहेत. तर अशाप्रकारे नेटकऱ्यांनी ट्रेलरला नापसंती दाखवली. काही नेटकरी याचा स्क्रीनशॉट काढून ट्वीटरवर शेअर करत आपली प्रतिक्रिया देत आहेत. पाहा नेटकऱ्यांची प्रतिक्रिया.

https://twitter.com/Anand63464/status/1293454284139278336?s=20

यापूर्वी सोमवारी दिवसभर #UninstallHotstar नावाचा हॅशटॅग ट्वीटरवर ट्रेंड होत होता. याद्वारे नेटकरी सडक २ चित्रपटाचा ट्रेलर न पाहण्याची तसेच भट्ट कुटुंबीयांचा हा चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी करत होते.

संजय दत्त आणि पूजा भट्ट अभिनित १९९१ मध्ये आलेला सडक या चित्रपटाचा सडक २ हा सीक्वेल आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, पूजा भट्ट त्यासोबत संजय दत्त आणि आदित्य कपूर असे स्टारकिड्स मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केले. तर तब्बल २० वर्षानंतर महेश भट्ट या चित्रपटाद्वारे पुन्हा दिग्दर्शन क्षेत्राकडे वळत आहेत. सुरुवातीस हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार होते. त्यानंतर आता हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *