सई ताम्हणकर (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

अभिनेत्री सई ताम्हणकरला मराठी सिनेसृष्टीतील हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखले जाते. आपल्या अभिनय, स्टाईल आणि लूकसाठी प्रसिद्ध असणारी सई आपल्या बोल्ड शैलीमुळेही ओळखली जाते. सोशल मीडियावर तिच्या हटके स्टाईलची तर नेहमीच चर्चा असते. अशी ही बोल्ड अँड ब्यूटिफूल सईने नुकतेच तिचे साडीतील काही फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले (Sai Tamhankar Hot Look In Gray Colour Saree) आहेत. साडीतील तिचा हा हॉट अंदाज चाहत्यांना फारच आवडत आहे.

सईने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर तिचे हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये दिसत आहे की, सईने ग्रे रंगाची साडी नेसलेली आहे. यावर तिने मँचिंग सिल्वर ज्वेलरी घातली आहे. या साडीत सई खूपच सुंदर दिसत असून फोटोतील तिच्या अदा चाहत्यांना घायाळ करणाऱ्या अशाच आहेत. हे फोटो शेअर करत सईने ‘साडी और सादगी संग संग’ असे कॅप्शनही दिले आहे.

सईचे हे फोटो पाहून चाहते फिदा होत लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. आतापर्यंत तिच्या या फोटोंना १ लाखापेक्षा अधिक लोकांनी लाईक केले आहेत. चाहत्यांसोबत अनेक कलाकारही कमेंट करत आपली प्रतिक्रिया देत आहेत. सईच्या फोटोवर कमेंट करताना प्रसाद ओकने लिहिले की, ‘कडकSSSS’. तर हेमंत ढोमेने लिहिले की, ‘सुंदर…’. तेजस्विनी पंडितने लिहिले की, ‘हायSSSS’.

सईच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास ती २००८ साली ‘सनई चौघडे’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘दुनियादारी’ या चित्रपटाच्या यशामुळे सई ताम्हणकरला मराठी चित्रपटसृष्टीत नवी ओळख मिळाली. यासोबतच ‘बालक पालक’, ‘वजनदार’, ‘क्लासमेंट्स’, ‘राक्षस’, ‘गर्लफ्रेंड’, ‘वायझेड’, ‘टाईम प्लीज’, ‘जाऊद्या ना बाळासाहेब’, ‘धुरळा’ यांसारख्या चित्रपटात सईने दमदार भूमिका साकारल्या. सध्या ती सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे. लकवरच ती कलरफुल या चित्रपटातही दिसणार आहे.