सुपरस्टार सलमान खान आणि त्याचा बॉ़डीगार्ड शेरा (फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान त्याच्या आगामी चित्रपटाकरता चांगलाच चर्चेत आहे. ‘अंतिम : द फायनल ट्रूथ’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये सलमान सध्या व्यस्त आहे. यासोबतच ‘बिग बॉस १४’ चे सूत्रसंचालन ही सलमान करतोय. सलमानने त्याच्या अभिनयाद्वारे फॅन्सचे मन जिंकून घेतले आहे. सलमानचे त्याचा बॉडीगार्ड ‘शेरा’ सोबत असलेले नाते आपल्या सगळ्यांनाच परिचित आहे. सलमानने नुकताच इन्स्टाग्रामवर त्याच्या शेरा या बॉडीगार्डसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघे ही सरदारच्या लूकमध्ये दिसत आहेत. दोघांनी पगडी घातली आहे. सलमानच्या या पोस्टवर चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.

सलमानने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा दोघांचा पगडीचा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलयं की, ‘लॉयल्टी’..!(निष्ठा) अशा शब्दांमध्ये सलमानने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सलमानने दाढी वाढवलेली पहायला मिळतेयं आणि त्याने डोक्यावर पंजाबी पगडी घातलेली दिसत आहे. सलमानप्रमाणेच शेराने ही हाच लूक कॅरी केला आहे. ‘अंतिम’ चित्रपटामध्ये सलमान शीख पोलिसाची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याकरता त्याने हा लूक कॅरी केला आहे. सलमानप्रमाणेच शेराने काळ्या रंगाचा टीशर्ट घातला असून त्यावर काळ्या रंगाचीच मॅचिंग पगडी घातली आहे. सलमानच्या या फोटोवर काही तासांमध्येच चाहत्यांनी दीड लाखांपेक्षा जास्त लाईक्सचा वर्षाव केला आहे. चाहत्यांना सलमान आणि शेराचा हा फोटो आवडला असून त्यांनी यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास सलमान सध्या कलर्स वाहिनीवरील वादग्रस्त शो ‘बिग बॉस १४’ चे होस्टिंग करत आहे. या शिवाय सलमान लवकरच ‘राधेः यॉर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सलमानसोबत या चित्रपटात अभिनेत्री दिशा पटानी दिसणार आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. या व्यतिरिक्त सलमान सध्या ‘मुळशी पॅटर्न’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये व्यस्त आहे. अंतिमः द फाइनल ट्रूथ’ असे या हिंदी रिमेकचे नाव आहे.