रवींद्र कौशिक हे भारतातील आजवरचे सर्वोत्तम जासूस होते असे मानले जाते. देशासाठी बलिदान देणाऱ्या रवींद्र कौशिक यांच्या जीवनावर आधारित एक सिनेमा येणार आहे. त्यात रवींद्र कौशिक यांचे कॅरेक्टर सलमान खान निभावताना दिसणार आहे.

दबंग सलमान खान लवकरच टायगर थ्री या सिनेमाचे शूटिंग चालू करणार आहे. या सिनेमामध्ये त्याच्यासोबत कॅटरिना कैफ झळकणार आहे. याआधी आलेल्या ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर तुफान हिट झाले होते. सलमान आणि कॅटरिनाची केमिस्ट्री लोकांना प्रचंड आवडते. सलमान खानने यामध्ये एका भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली होती तर कॅटरिना कैफने पाकिस्तानी पाकिस्तानी गुप्तहेराची भूमिका केली होती. सिनेमांमध्ये दिसणारे साधे सरळ गुप्तहेराचे कॅरेक्टरचे वास्तविक आयुष्य मात्र अजिबात सोपे नसते.

रवींद्र कौशिक हे भारतातील आजवरचे सर्वोत्तम गुप्तहेर होते असे मानले जाते. त्यांना ब्लॅक टायगर म्हणून ओळखले जायचे. रिसर्च अँड अनालिसिस विंग (रॉ) ऑपरेटर म्हणून ते काम पाहायचे. आपल्या जिवाची बाजी लावून पाकिस्तान आर्मीमधील अधिकाऱ्यांची सर्व माहिती त्यांनी रॉ ला दिली होती. पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या अशा आतल्या बातम्या काढणे हे निश्चितच सोपे काम नव्हते. पण रवींद्र कौशिक यांनी ते काम केले होते. म्हणूनच त्यांना भारतातील आजवरचे सर्वोत्तम गुप्तहेर म्हणून ओळखले जाते. १९७९ ते १९८३ या कालावधीत ते रॉ साठी काम करायचे.

आपले काम करत असतानाच पाकिस्तानी गुप्तचर संघटनेला त्यांच्याबद्दल माहिती मिळाली आणि त्यांना अटक करण्यात आली होती. पाकिस्तानी जेलमध्ये त्यांना जेरबंद करून ठेवण्यात आले होते. तिथेच त्यांचा मृत्यू झाला होता. देशासाठी बलिदान देणाऱ्या रवींद्र कौशिक यांच्या जीवनावर आधारित एक सिनेमा येणार आहे. त्यात रवींद्र कौशिक यांची भूमिका सलमान खान निभावताना दिसणार आहे. बॉयोग्राफी सिनेमात काम करताना सलमान प्रथमच पाहायला मिळणार आहे. नो वन किल्ड जेसिका, घनचक्कर, रेडी आणि आमिर या सिनेमाचे लेखक राजकुमार गुप्ता हे या सिनेमाची स्क्रिप्ट लिहिणार आहेत. मागील पाच वर्षांपासून ते रवींद्र कौशिक यांच्या जीवनाशी संबंधित गोष्टींवर संशोधन देखील करत आहेत. सलमान खानचा हा सिनेमा निश्चितच स्पेशल असणार ह्यात काही वादच नाही. कभी ईद कभी दिवाली आणि टायगर ३ असे सलमानचे आगामी सिनेमे प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.