बॉलिवूडचा दबंग सलमान खान (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाची घडी विस्कटलेली बघायला मिळते आहे. आपली मनोरंजनसृष्टी सुद्धा या विळख्यात अडकलेली बघायला मिळते. काही सिनेमांचे शूटिंग रखडलेले आहे तर काही निर्मात्यांनी आपल्या चित्रपटांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर म्हणजेच ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. पण भाईजान काही स्वतःचे चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याच्या विचारात दिसत नाहीत.

सलमान खानचा चित्रपट म्हणजे ॲक्शन, रोमान्स आणि हिट गाण्यांचे एक पॅकेज असते. आणि हा सिनेमा ३०० कोटींची कमाई करणार हे अगदी पक्के असते. सलमान खानचा एक जवळचा निर्माता मित्र ‘बॉलिवूड हंगामा’शी सवांद साधताना म्हणाला, सलमानचा चित्रपट ऑनलाइन प्रदर्शित होऊच शकत नाही. त्याच्या चाहत्यांना त्याला मोठ्या पडद्यावरच बघायला आवडते त्यामुळे ते त्याचा कोणताही सिनेमा लहान पडद्यावर प्रदर्शित होऊ देणार नाहीत.

 

आपल्या फॅन्सना खूश कसे ठेवायचे हे सलमानला चांगलेच ठाऊक आहे. लॉकडाऊनमध्येही त्याने ‘प्यार करोना’ आणि ‘तेरे बिना’ या दोन गाण्यांची भेट आपल्या चाहत्यांना दिली.विशेष म्हणजे ही दोन्ही गाणी त्याने पनवेल इथल्या आपल्या फार्महाऊसवर लॉकडाऊनचे सगळे नियम पाळत शूट आणि रेकॉर्ड केली आहेत.

अमिताभ बच्चन आणि आयुष्यमान खुराना यांचा ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला. त्याला मिळालेल्या संमिश्र प्रतिसाद पाहून सलमानसारखे अनेक सुपरस्टार्स सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मपासून लांब राहणेच पसंत करत आहेत.

दबंग खानच्या सध्या दोन चित्रपटांच ‘राधे’ आणि ‘कभी ईद कभी दिवाली’ चे शूटिंग शेवटच्या टप्प्यात आहे. या दोन्ही सिनेमांचा निर्माता स्वतः सलमान खान आहे. भाईजानचा नवा सिनेमा कधी प्रेक्षकांना बघायला मिळणार हे सध्या कोणीच सांगू शकत नाही.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *