खामोशी, हम दिल दे चुके सनम, बाजीराव मस्तानी, पद्मावत, रामलीला, ब्लॅक असे सर्वोत्कृष्ट सिनेमे देणारे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे बॉलीवूडमधील एक नावाजलेलं नाव आहे.

खामोशी, हम दिल दे चुके सनम, बाजीराव मस्तानी, पद्मावत, रामलीला, ब्लॅक असे सर्वोत्कृष्ट सिनेमे देणारे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे बॉलीवूडमधील एक नावाजलेलं नाव आहे. भन्साळींसोबत काम करण्यासाठी प्रत्येक कलाकार उत्सुक असतो. त्यांच्या सिनेमामध्ये छोट्यातल्या छोटा रोल करण्यासाठी देखील मोठा कलाकार अजिबात नाही म्हणत नाही. परफेक्शन, आर्ट आणि व्हिजन याचे उत्तम मिश्रण असलेला माणूस म्हणजे दिग्दर्शक म्हणजेच संजय लीला भन्साळी होय.

संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट या दोघांनी एकत्र येऊन गंगुबाई काठियावाडी या सिनेमावर काम केले आहे. या सिनेमाचं चित्रीकरण होऊन प्रदर्शनासाठी हा सिनेमा सज्ज आहे. पण हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार की चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार यावरून मधे बऱ्याच बातम्या मीडियामध्ये आल्या होत्या. पण आता सूत्रांकडून अशी खात्रीशीर बातमी मिळत आहे की, संजय लीला भन्साळी यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यास साफ नकार दिला आहे. कारण आलिया भट्ट आणि संजय लीला भन्साळी यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. संजय लीला भन्साळी यांच्या अपेक्षे पलीकडे जाऊन सुंदर काम आलिया भटने या सिनेमामध्ये केले आहे. तिच्या या कामाला पूर्ण न्याय मिळालाच पाहिजे. अशा मताचे संजय लीला भन्साळी आहेत. त्यामुळे हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

गंगूबाई काठियावाडी या सिनेमाचा टीझर मागे प्रदर्शित झाला होता. या सिनेमातील प्रत्येक सीनमध्ये आलिया भटने आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनय कौशल्याचा नमुना दाखवला होता. या टीजरमध्ये आलिया भटचा हा दोन मिनिटांचा परफॉर्मन्स पाहून प्रेक्षक भारावून गेले असतील तर संपूर्ण सिनेमा बघितल्यानंतर प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया असेल? हे अशा शब्दांत सांगणे कठीणच आहे.