संस्कृती बालगुडे (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

अभिनेत्री संस्कृती बालगुडेने सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती एका इंग्लिश गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे. व्हिडिओत तिचे जबरदस्त डान्स स्टेप पाहायला मिळत असून चाहते तिच्या डान्सचे कौतुक करताना थकत नाहियेत. व्हिडिओ शेअर करत संस्कृतीने Don’tRushChallenge चा उल्लेख केला आहे.

संस्कृतीने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर तिचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, संस्कृती ‘Don’t Rush’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसून येत आहे. संस्कृतीचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या फारच पसंतीस उतरत असून चाहते तिचे भरभरून कौतुक करत आहेत. तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहते तिचे डान्स स्टेप्स, तिचा स्वॅग, तिची एनर्जी, तिचे एक्सप्रेशन अशा अनेक गोष्टींचे कौतुक करत आहेत.

संस्कृतीने ‘पिंजरा’ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले. तिची ही पहिलीच मालिका चांगली गाजली व ती घराघरांत पोहोचली. त्यानंतर तिने ‘शॉर्टकट’, ‘भय’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले. मालिकेत काम करत असतानाच तिला ‘सांगते ऐका’ चित्रपटाची ऑफर मिळाली. या चित्रपटातून तिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले.

‘सांगते ऐका’नंतर संस्कृतीने ‘निवडूंग’, ‘शिव्या’ ‘एफयू’, ‘टेक केअर गुड नाईट’ या मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाची कसब दाखवली. ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. नुकताच संस्कृतीचा ‘धरला माझा हात’ हा म्यूझिक अल्बम प्रदर्शित झाला. यामध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज दिसून आला. लवकरच ती ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी या चित्रपटात दिसणार आहे.