अभिनेत्री सारा अली खान (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार )

गेल्या काही दिवसांपासून आपण पाहत आहोत की कोरोना संसर्गाच्या विळख्यात बॉलिवूडचे अनेक कलाकार अडकले आहेत. बच्चन कुटुंबियांनंतर आता सारा अली खानच्या ड्रायव्हरला देखील कोरोना झाल्याचे समोर आले आहे. खुद्द साराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती सर्वांना दिली.

सारा आपल्या पोस्टमध्ये असे म्हणते की,  “मी तुम्हाला सांगू इच्छिते की आमच्या ड्रायव्हरची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आम्ही मुंबई महापालिकेला तात्काळ संपर्क साधला आणि त्याला विलगीकरण कक्षात हलवले. माझे कुटुंब, घरी काम करणारे इतर कर्मचारी आणि मी आम्ही सर्वांनीही चाचणी केली असून, आमचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहेत. आम्ही आवश्यक ती दक्षता घेत आहोत. योग्य ती मदत आणि मार्गदर्शन केल्या बद्दल मी आणि माझे कुटुंबीय मुंबई महापालिकेचे आभारी आहोत.”

शनिवारी ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. या नंतर रेखा यांचा बंगला सील केला गेला.

अनुपम खेर यांच्या घरी त्यांची आई, भाऊ, वहिनी आणि पुतणी यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे स्वतः अनुपम खेर यांनी एका व्हिडिओ द्वारे सांगितले.

आतापर्यंत कोरोना व्हायरसची लागण लाखो लोकांना झाली. यामध्ये बॉलिवूड कलाकारांचाही समावेश आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बोनी कपूर यांच्या घरात काम करण्याऱ्या कर्मचाऱ्याला या संसर्गाची लागण झाली होती. यानंतर आमीर खान यांच्या घरात ही करोनाने शिरकाव केल्याची माहिती समोर आली होती.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *