अभिनेता शाहरुख खान (फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

बॉलिवूडचा बादशहा अभिनेता शाहरुख खानचा आगामी चित्रपट पठाणच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून या चित्रपटाच्या सेटवरील शाहरुखचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ही झाले होते. नुकतचं या सिनेमाच्या सेटवर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि एक असिस्टंट डायरेक्ट यांच्यामध्ये मारहाण झाल्याची बातमी पसरली होती. परंतु,आता या सर्व प्रकारावरील खरी माहिती समोर आलीयं ती अशी की, ही मारहाण झाल्याची बातमी खोटी असून त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता मारहाण नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आनंद यांचे त्यांच्या टीमसोबत चांगले संबंध असून सर्वांशी चांगले बॉन्डिंग ही आहे.

सेटवर घडलेल्या घटनेबाबत बोलताना सूत्रांनी सांगितले की, सिद्धार्थ आनंद आणि असिस्टंट डायरेक्टर यांच्यात वाद झाल्याची घटना ही पूर्ण तथ्यहीन असून खोटी देखील आहे. सिद्धार्थ आणि त्यांच्या टीमची बॉन्डिंग खूप चांगली आहे. बऱ्याच वर्षांपासून सर्वजण एकत्र काम करत आहेत. संपूर्ण टीम आनंद यांना मोठा भाऊ मानते. घटनेबद्दल बोलताना सूत्रांनी सांगितले की, खरं तर त्यादिवशी सेटवर लाईटमॅन हा काम करताना जखमी झाला होता. मात्र, त्याला खूप लागले ही नव्हते. परंतु, त्याचवेळी सेटवरील एक ज्युनिअर आर्टिस्ट या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. त्यावेळी आनंद यांना त्याच वागणं काही आवडलं नाही आणि ते त्याला म्हणाले की व्हिडिओ काढू नको.

पुढे बोलतान सूत्रांनी सांगितले की, सिद्धार्थ यांनी त्या ज्युनिअर आर्टिस्टला व्हिडिओ काढू नको अशी तंबी दिली तरी सुद्धा तो लपून व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. त्यामुळे आनंद यांच्या टीम लीडरने त्याला त्याचा मोबाईल मागितला आणि सेटवरुन निघून जाण्यास सांगितले. सिद्धार्थ यामुळे दु:खी झाले की कुणाला जखम झालेली असताना तो ज्युनिअर आर्टिस्ट याचा व्हिडिओ कसा काय रेकॉर्ड करु शकतो, तर दुसऱ्या बाजूला त्या ज्युनिअर आर्टिस्टने आक्रमक होण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याला सुरक्षारक्षकांनी सेटवरुन बाहेर काढले. त्यामुळे ही संपूर्ण अशी खरी घटना त्यादिवशी सेटवर घडली होती. यामध्ये कुठेच कुणाला मारहाण झाली नव्हती.