श्रद्धा कपूरने आपल्या चाहत्यांना त्यांच्या या प्रेमासाठी धन्यवाद देताना आपल्या सोशल मिडियावर स्वहस्ताक्षरात तीन भाषांमध्ये पत्र लिहिले आहे. (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार )

श्रद्धा कपूरने नुकताच सोशल मिडीयावर पाच कोटी फॉलोअर्सचा आकडा पार केला असून आपल्या चाहत्यांना त्यांच्या या प्रेमासाठी धन्यवाद देताना तिने सोशल मीडियावर स्वहस्ताक्षरात तीन भाषांमध्ये पत्र लिहिले आहे. श्रद्धा कपूरने आपल्या सोशल मीडियावर पत्र शेअर करताना लिहिले, “माझ्या सर्व प्रिय, जेम्स, बाबूडी, फैन क्लब, आणि हितचिंतकांनो, तुम्ही प्रेमाने बनवलेल्या व्हिडीओ आणि पोस्ट मी पहिल्या आणि माझे मन भरून आले. मी तुमच्या सर्वांमुळे इथे आहे. तुम्हा सर्वांना माझ्याकडून भरपूर प्रेम, असेच सुखी आणि आनंदी राहा. कृपया स्वत:ची काळजी घ्या आणि एकमेकांसोबत प्रेमाने राहा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद! पाच कोटी वेळा – श्रद्धा

 

श्रद्धा पाच कोटींचा आकडा पार करणाऱ्या काही मोजक्या सेलिब्रिटींपैकी एक असण्याचे कारण हे देखील आहे कि ती आपल्या या प्रभावाचा उपयोग #LockdownZoos सारख्या सामाजिक चळवळींसाठी करते आणि चाहत्यांना वेळोवेळी आग्रह करते की त्यांनी देखील प्राण्यांना वाचवण्यासाठी शक्य तेवढी मदत करावी. एका अभिनेत्री असण्यासोबतच, पर्यावरण कार्यकर्त्याच्या रुपात, लाकडापासून बनवलेला टूथब्रश वापरणे, स्नानसाठी केवळ एक बादलीच पाणी वापरणे आदी गोष्टींचा श्रद्धा अंगीकार करते. या गोष्टी तिला इतरांपासून वेगळं आणि विश्वासार्ह बनवतात.

समाज माध्यमांवरची तिची मतं मनापासून व्यक्त केलेली असतात. कोणीही त्यापासून प्रेरित होऊ शकतो. या व्यतिरिक्त, अभिनेत्री व्हर्चुअल जगात, आपल्या मजेदार आणि वास्तविक आयुष्यात ती जशी आहे त्याच तऱ्हेने स्वत:ला सादर करण्यासाठी ओळखली जाते. तिची हीच गोष्ट चाहत्यांना अधिक आवडते आणि प्रेक्षकांसोबत असलेले तिचे नाते अधिक घट्ट बनवते.

समाजमाध्यमावरील श्रद्धाच्या पोस्ट खूपच सौहार्दतापूर्ण असतात कारण त्यामध्ये फॅशनपासून बीटीएस, चित्रपट, पर्यावरण यावर नवनवीन अपडेट आणि जगभरात घडणाऱ्या गोष्टींचा आनंद घेण्यापर्यंत सर्व काही असते. यावरून हे देखील कळते की एक व्यक्ती म्हणून श्रद्धा किती जागरूक आणि संवेदनशील आहे.

श्रद्धा कपूर लवकरच रणबीर कपूरच्या सोबत लव रंजन यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *