अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार )

मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करून तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेला, ‘अग्निहोत्र’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे सिद्धार्थ चांदेकर. मूळचा पुण्याचा असलेल्या सिद्धार्थने  ‘कशाला उद्याची बात’, ‘प्रेम हे’ या मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

२०१९ साली सिद्धार्थची हॉटस्टारवर  ‘सिटी ऑफ ड्रीम’ ही वेब मालिका प्रदर्शित झाली. या मालिकेत सिद्धार्थ सोबत प्रिया बापट मुख्य भूमिकेत दिसते. ही वेब मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. सिद्धार्थने अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटात निरनिराळ्या पद्धतीच्या भूमिका साकारल्या आहेत.

 

झेंडा – अवधूत गुप्ते दिग्दर्शित या चित्रपटात सिद्धार्थ आपल्याला मुख्य भूमिकेत दिसतो. या चित्रपटात तेजश्री प्रधान आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्यावर चित्रित करण्यात आलेले ‘सांग ना रे मना’ हे गाणे अजूनही चाहत्यांच्या ओठांवर आहे.  झेंडा या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली होती.

उदय 

३१ डिसेंबर

सातरंगी रे – सातरंगी रे हा चित्रपट पदवीच्या शेवटच्या वर्षाला शिकत असणाऱ्या मुलांचा आहे. या मित्रांना संगीतात विशेष रुची असते. या मुलांच्या आयुष्यात असे काही प्रसंग घडतात ज्यामुळे त्यांचे सगळे आयुष्य बदलून जाते. सिद्धार्थ बरोबर या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, आणि पूजा सावंत हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

जय जय महाराष्ट्र माझा

संशयकल्लोळ

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

लग्न पहावे करून – अदिती (मुक्ता बर्वे)आणि निशांत(उमेश कामत) एक विवाहसंस्था उघडतात ज्यात त्यांना सिद्ध करायचे असते की कुंडली न बघता सुद्धा लग्न टिकू शकतात. या चित्रपटात सिद्धार्थ बरोबर उमेश कामत, मुक्ता बर्वे, तेजश्री प्रधान हे मुख्य भूमिकेत आहेत.

दुसरी गोष्ट

बावरे प्रेम

क्लासमेट्स – या चित्रपटात सिद्धार्थने साकारलेला  खोडकर अनी आपल्या सर्वांच्या लक्षात राहतो. अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी या कलाकारांसोबत सिद्धार्थला  काम करण्याची संधी मिळाली. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतो.

साटं लोटं सगळं खोटं

ऑनलाईन बिनलाईन

लॉस्ट अँड फाऊंड

पिंडदान

वजनदार – या चित्रपटात सिध्दार्थला प्रिया बापट आणि सई ताम्हणकर हे मुख्य भूमिकेत दिसतात.

बस स्टॉप

गुलाबजाम –सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी या चित्रपटात केलेल्या सुंदर अभिनयाची नेहमीच  चर्चा होते. सचिन कुंडलकरने या चित्रपटाद्वारे  मराठी खाद्यसंस्कृतीची ओळख प्रेक्षकांना करून दिली.

रणांगण

मिस यु मिस्टर