सोनाली कुलकर्णी (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. यासाठी सोनाली फारच उत्सुक असून तिने लग्नाची तयारीही सुरु केली आहे. सोनाली लग्नात सुंदर दिसण्यासाठी सध्या स्कीन ट्रीटमेंट घेत आहे. नुकतीच ती तिच्या डर्माटोलॉजिस्ट (त्वचारोगतज्ञ) कडे गेली असता तिने फावल्या वेळेत काही फोटोशूट केले. विशेष म्हणजे तिचे हे फोटो तिच्या डर्माटोलॉजिस्टनेच काढले आहेत.

सोनालीने तिचे हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. यामध्ये सोनाली सोफ्यावर आरामशीर बसलेली दिसून येत आहे. फ्लोरल फ्रिंट असलेल्या लाईट पिंक कलरच्या वनपीसमध्ये सोनाली फारच सुंदर दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील हास्यामुळे ती अधिकच सुंदर दिसत आहे. फोटो शेअर करत सोनालीने लिहिले की, ‘जेव्हा तुम्ही डर्माटोलॉजिस्टच्या ऑफिसमधील रिसेप्शनमध्ये निवांतपणे बसता आणि तुमची डर्माटोलॉजिस्टच तुमचे फोटो काढते तेव्हा…’

सोनालीने यापूर्वीही एक व्हिडिओ शेअर करत स्कीन ट्रीटमेंटसाठी डर्माविल्लामध्ये आल्याचे सांगितले होते. तसेच या व्हिडिओत सोनालीने तिचा पाच महिन्यानंतर लग्न असून त्यासाठी ती तयारी करत असल्याचेही सांगितले. मात्र, यावेळी तिने तिच्या लग्नाची तारीख गुलदस्त्यात ठेवली. सध्या सोनाली दररोज स्किन ट्रीटमेंटसाठी डर्मालॉजिस्टकडे जात असून तिच्यासोबत तिच्या चाहत्यांनीही लाईव्ह व्हिडिओद्वारे त्यांच्या स्किनची काळजी कशी घ्यावी हे सांगत आहे.

सोनालीने मागील वर्षी २ फेब्रुवारी २०२० रोजी कुणाल बेनोडेकरसोबत साखरपुडा केला. याबाबत तिने तिच्या वाढदिवशी सोशल मीडियावर फोटो शेअर करत माहिती दिली होती. कुणाल हा ASL या इंटरनॅशनल कंपनीचा चार्टर्ड अकाऊटंट म्हणून काम करत असून तो दुबईत राहतो. खरंतर २०१८ पासूनच सोनाली आणि कुणाल एकमेकांना डेट करत होते. कुणालच्या इन्स्टाग्रामवर तेव्हापासूनचे दोघांचे फोटो पाहायला मिळतात. सोनालीने साखरपुड्याच्या आधीपासूनच दोघांचे हे नाते चांगलेच सिक्रेट ठेवले होते. त्यामुळे तिच्या वाढदिवसाला तिने ही साखरपुड्याची बातमी शेअर करताच चाहत्यांना सुखद आश्चर्याचा धक्काच बसला.