सोनू सूद (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

सोशल मीडिया ॲनालिटिक्स वेबसाईट ट्विटीट (Twitteet) द्वारे दर महिन्याला ट्विटरवर जास्त प्रमाणात एंगजेमेंट असणाऱ्या सेलिब्रिटींची यादी प्रसिद्ध करण्यात येते. यामध्ये राजकारण, बॉलिवूड, पत्रकारिता, व्यवसाय, लेखक आणि क्रीडा यासारख्या २० कॅटेगिरींचा समावेश असतो. त्यानुसार प्रत्येक कॅटेगिरीतील टॉपच्या व्यक्तींची नावे या अहवालाच्या माध्यमातून देण्यात येतात.  ट्विटीटने जानेवारी २०२१ या महिन्याचा आपला रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार बॉलिवूड कॅटेगिरीमध्ये जानेवारी महिन्यात सोनू सूद सर्वात सक्रिय असल्याचे समोर आले आहे. तर राजकीय आणि इतर सर्व कॅटेगिरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात अव्वल स्थानावर आहेत.

Twitteet ने प्रसिद्ध केलेल्या एंगेजमेंट (ट्विटरवर सक्रियतेवर आधारित) रिपोर्टनुसार, बॉलिवूड कॅटेगिरीमध्ये अभिनेता सोनू सूद पहिल्या क्रमांकावर आहे. त्याची ट्विटरवरील एंगेजमेंट १४,२६,२८६ इतकी आहे. त्यानंतर ७.२ लाख एंगेजमेंटसह अक्षय कुमार या कॅटेगिरीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर ६.८२ लाख एंगेजमेंटसोबत अनुपम खेर, चौथ्या क्रमांकावर ४.८९ लाख एंगेजमेंटसोबत अमिताभ बच्चन आणि ३.६० लाख एंगेजमेंटसोबत शाहरूख खान या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

बॉलिवूड फीमेल स्टार कॅटेगिरीत अभिनेत्री दिशा पाटनी ३.२८ लाख एंगेजमेंटसोबत पहिल्या क्रमांकावर आणि सनी लियोनी २.११ लाख एंगेजमेंटसोबत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर बॉलिवूड कॅटेगिरीत अनुक्रमे सहावा आणि दहावा क्रमांक मिळवत या दोन महिला सेलिब्रिटी टॉप १० मध्ये आहेत. त्यानंतर सलमान खान ३.२२ लाख एंगेजमेंटसोबत सातव्या क्रमांकावर, ह्रतिक रोशन २.९५ लाख एंगेजमेंटसोबत आठव्या क्रमांकावर आणि रितेश देशमुख २.८१ लाख एंगेजमेंटसोबत नवव्या क्रमांकावर आहे.

राजकीय कॅटेगिरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटवरील एंगेजमेंट ८०,२९,७३३ एवढी आहे. याद्वारे राजकीय कॅटेगिरीमध्ये ते पहिल्या क्रमांकावर आहेत. तसेच या एंगेजमेंटद्वारे पंतप्रधान मोदी सर्व कॅटेगिरीमध्ये अव्वल स्थानावर आहेत.

कोणत्या कॅटेगिरीमध्ये कोणी मारली बाजी –

राजकीय – पंतप्रधान नरेंद्र मोदी (एंगेजमेंट – ८०,२९,७३३)

बॉलिवूड – सोनू सूद (एंगेजमेंट – १४,२६,२८६)

बिझनेस हेड – सुंदर पिच्चई (एंगेजमेंट –४,३८,७०४)

क्रीडा – विराट कोहली (एंगेजमेंट – २६,२४,९३५)

स्पोर्ट्स स्टार (नॉन क्रिकेट) विजेंद्र सिंह (एंगेजमेंट – ५,३१,२२९)

टीव्ही स्टार – सिद्धार्थ शुक्ला (एंगेजमेंट – ३,२१,९६३)

पत्रकार – दीपक चौरसिया (एंगेजमेंट – २३,९१,३०९)

फाउंडर्स – कुणाल शाह (एंगेजमेंट – ९९,०१५)

कॉमेडियन – कुणाल कामरा (एंगेजमेंट – ५,८२,६६१)

रिजनल सिनेमा स्टार – महेश बाबू (एंगेजमेंट – ७,५८,९९४)

आर.जे – रेडिओ मिर्चीची सायेमा (एंगेजमेंट – २,९७,८९६)