फोटोच्या मध्यभागी खुशी कपूर आणि इतर बॉलिवूड अभिनेत्री (फोटो सोशलमीडियावरुन साभार)

बॉलिवूड दिग्दर्शक बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची छोटी मुलगी खुशी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यासंदर्भातली माहिती स्वत: बोनी कपूर यांनी दिली आहे. खुशी सध्या अमेरिकेमध्ये अभिनयाचा कोर्स करत आहे. ती अभिनयाचे शिक्षण घेतेयं. ती आता फक्त २० वर्षांची आहे. मात्र, तरी ही खुशी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. खुशी पूर्वीच बॉलिवूडच्या अनेक स्टार किड्सने कमी वयात पदार्पण केले आहे. चला तर मग एक नजर टाकूयात या स्टारकिड्सवर…

जान्हवी कपूर – खुशीची मोठी बहीण अभिनेत्री जान्हवी कपूरने २०१८ मध्ये ‘धडक’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यावेळी खुशीचे वय २१ वर्षे होते. हा चित्रपट जास्त चालला नाही मात्र, जान्हवीच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले होते. त्यानंतर तिला ‘गुंजन सक्सेना’ आणि नेटफ्लिक्सवरील ‘घोस्ट स्टोरीज’ ही फिल्म मिळाली होती. या दोन्ही चित्रपटांमधील तिचा अभिनय सर्वांनाच आवडला होता. या वर्षात तिचा ‘दोस्ताना २’ आणि ‘तख्त’, ‘रूही अफसाना’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

सारा अली खान – अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची मुलगी अभिनेत्री सारा अली खानने २०१८ मध्ये ‘केदारनाथ’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी सारा २३ वर्षांची होती. तिचा हा पहिला चित्रपट जरी फ्लॉप ठरला असला तरी त्यानंतर तिला अनेक चित्रपट मिळाले. त्यामध्ये ‘सिंबा’, ‘लव आज कल २’, ‘कुली नंबर १’ इत्यादी चित्रपटांचा समावेश आहे.

अनन्या पांडे – बॉलिवूडचा कॉमेडी अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडेने ही २०१९ मध्ये ‘स्टुडन्ट ऑफ द ईयर २’ या चित्रपटातून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी ती २१ वर्षांची होती. हा चित्रपट ही बॉक्स ऑफिसवर चालला नाही मात्र, अनन्याला चांगल्या चित्रपटांची ऑफर मिळाली. ज्यामध्ये ‘पति पत्नी और वो’ आणि ‘खाली-पीली’ या चित्रपटांचा समावेश आहे.

आथिया शेट्टी – अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री आथिया शेट्टीनेही २०१५ मध्ये ‘हिरो’ या चित्रपटातून इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले. हा चित्रपट ही फ्लॉप ठरला होता. मात्र, त्यानंतर ती ‘मुबारका’, ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटांतून प्रमुख भूमिकेत झळकली होती.