'काय पो चे' या सिनेमातून त्यांने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आणि पुन्हा मागे वळून कधीच पाहिले नाही.

२०२० हे वर्ष बॉलीवूडसाठी खूपच वाईट होते. अनेक दिग्गज अभिनेते कलाकारांचे यावर्षी निधन झाले. पैकी सुशांत सिंग राजपूत हे नाव अगदीच लक्षात राहण्यासारखे होते.  सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू हे आजही एक न उलगडलेलं कोडच आहे. राजकारण, बॉलीवूडमधील नेपोटिझम असे बरेच मुद्दे त्याच्या मृत्यूसोबत जोडले गेले होते. नक्की सत्य काय? ते सत्य सुशांत सोबतच निघून गेलं आहे आणि तेच खरं आहे.

दोन दिवसांपूर्वीच सुशांतचे ऑफिशिअल फेसबुक पेज ॲक्टिव्ह असल्याचे दिसून आले. त्याचा डीपी चेंज केला गेला होता. त्यामुळे सुशांतचे फॅन्स त्याच्या आठवणीने पुन्हा एकदा अगदी भावूक झालेले दिसून आले. त्या फोटोवर बऱ्याच चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. त्याच्या चाहत्यांना आजही सुशांत कुठूनतरी परत येईल अशी वेडी आशा आहे. ‘काश तू आज जिवंत असतास आणि तू स्वत:च डीपी चेंज केला असतास’ अशा अनेक भावनिक कमेंट्स चाहत्यांनी त्याच्या या फोटोवर दिल्या आहेत.

इंजिनीअरिंग स्टुडंट असणारा सुशांत एक उत्कृष्ट डान्सर देखील होता. एका डान्स ग्रुपमधून त्याने आपले करिअर सुरुवात केले होते. त्यानंतर त्याने थिएटरमध्ये देखील काम केले. टेलिव्हिजनवर बऱ्याच छोट्या मोठ्या मालिकांमध्ये त्यांने काम केले होते. पण ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे त्याला प्रसिद्धीच्या झोतात आणले होते. अंकिता लोखंडेसोबतच्या प्रेमसंबंधांमुळे देखील अंकिता आणि सुशांत दोघेही चर्चेत असायचे. ‘काय पो चे’ या सिनेमातून त्यांने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आणि पुन्हा मागे वळून कधीच पाहिले नाही. त्यानंतर आलेल्या ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’ या सिनेमामध्ये त्याने आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाची छाप पाडली होती. एमएस धोनीच्या जीवनावर आधारित सिनेमाने तर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. सुशांत आज जरी आपल्यात  नसला तरी त्याच्या सिनेमातील जिवंत अभिनयामूळे तो आजही जिवंत असल्याचा भास मात्र होतो.