अभिनेता स्वप्निल जोशी (फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

‘चॉकलेट बॉय’ अशी खास ओळख असलेला मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता म्हणजे स्वप्निल जोशी. स्वप्नील सध्या ‘चला हवा येऊ द्या’ च्या लेडिज स्पेशल पर्वात मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसतोय. स्वप्नीलने त्याच्या आगामी ‘समांतर २’ या वेबसिरीजचे शूटिंग नुकतेच पूर्ण केले आहे. या वेबसिरीजच्या चित्रीकरणाला सुरुवात केल्याची माहितीही त्याने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली होती. स्वप्नीलच्या या पहिल्यावहिल्या ‘समांतर’ वेब सीरिजला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. लॉकडाऊनमध्ये या वेब सीरिजमुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन झाले होते. स्वप्नील सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. त्याचे फोटो, व्हिडिओ तो शेअर करत असतो. यासोबतच तो त्याच्या आगामी चित्रपटांविषयी, कामाविषयी आणि कुटुंबाविषयीही फोटो शेअर करत असतो. नुकताच त्याने त्याचा बालपणीचा थ्रोबॅक सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

स्वप्नीलने त्याचा बालपणीचा सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनला त्याने लिहिलय की, आठवणी. स्वप्नील त्याच्या बालपणीच्या आठवणींमध्ये रमलेला पहायला मिळतोय. त्याच्या या लहानपणीच्या थ्रोबॅक फोटोवर चाहत्यांनीही भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. या फोटोत स्वप्नीलने पांढऱ्या रंगाचा सदरा आणि त्यावर काळ्या रंगाचे जॅकेट घातल्याचे दिसत आहे. या आउटफीटवर त्याने गोल टोपीही घातली आहे. या फोटोत तो अगदी निरागस दिसत आहे. त्याने कानात एक बाळीही घातली आहे. स्वप्नीलचा हा लहानपणीचा गोड फोटो चाहत्यांना खूपच आवडला आहे. त्यामुळे त्याच्यावर सध्या कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडताना दिसत आहे.

कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास स्वप्नीलच्या समांतर या पहिल्याच वेब सीरिजला भरपूर यश मिळाले. त्यानंतर आता या वेबसीरिजचा दुसरा भाग म्हणजे ‘समांतर २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वप्निलच्या चाहत्यांमध्ये त्यांच्या या वेबसीरिज बाबत चांगलीच उत्सुकता पहायला मिळतेय. नुकताच अभिनेता स्वप्निल जोशीने ‘समांतर २’ या वेबसीरिज संदर्भात इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये अंधारात स्वप्निल जोशी एका महिलेच्या खांद्यावर हात टाकून चालताना दिसत आहे. या व्हिडिओत दोघांचाही चेहरा दिसत नाहिये. कारण हा व्हिडिओ पाठीमागून काढलेला आहे. या व्हिडिओमध्ये ‘किती सांगायचेय मला…’ हे गाणं ऐकू येत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत स्वप्निलने कॅप्शनध्ये ‘WHO IS SHE ??? I am CURIOUS as hell to tell U! असे लिहिले होते.