अभिनेत्री तापसी पन्नू आणि अभिनेता प्रतिक गांधी (फोटो सोशलमीडियावरुन साभार)

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूच्या आगामी ‘लूप-लपेटा’ या चित्रपटाची सध्या चर्चा आहे. तापसी सध्या गोव्यामध्ये तिच्या या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. काही दिवसांपूर्वीच तापसीचा या चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर करण्यात आला होता. आता तापसी अभिनेता प्रतिक गांधीसोबत एका चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘वो लड़की है कहां?’ असे आहे. हा एक कॉमेडी-थरारक चित्रपट असणार आहे. निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनीही ट्विट करत याबद्दल माहिती शेअर केली आहे.

तरण यांनी ट्विटरवर यासंदर्भात ट्विट केले आहे. हे ट्विट करत त्यांनी लिहिलय की, तापसी पन्नू आणि प्रतिक गांधी ‘वो लडकी है कहा?’ या चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार. या चित्रपटाची निर्मिती सिद्धार्थ रॉय कपूर यांनी केली आहे. अशी माहिती तरण यांनी ट्विटरवरून दिली आहे. प्रतिक गांधी याने ‘स्कॅम १९९२’ या वेबसिरीजमध्ये काम केले होते. त्याच्या या कामाचे चांगलेच कौतुक करण्यात आले होते. आता तापसीसोबत तो पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटात तापसी एका महिला पोलिसाच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तापसी आणि प्रतिकच्या भूमिका या एकमेकांच्या विरुद्ध असणार आहेत. अर्शद सय्यद यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून त्यांनीच दिग्दर्शन केले आहे. प्रतिक हा मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या गाजलेल्या ‘स्कॅम १९९२’ या वेबसिरीजमध्ये झळकला होता. या वेबसिरीजने प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळवली होती. तापसीला या चित्रपटातील तिची भूमिका विशेष आवडली त्यामुळे तिने या सिनेमासाठी लगेच होकार कळवला. ‘लूप-लपेटा’ या चित्रपटानंतर तापसी ‘रश्मि रॉकेट’ या आगामी सिनेमातही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मागील काही दिवसांपूर्वीच तिने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.