वन लव' या इंग्लिश गाण्यावर त्या दोघींनी हा व्हिडिओ बनवला आहे.

सणवार म्हटलं की घरात उत्साहाचं वातावरण असतं. लांबून पाहुणे, बहीणभाऊ घरी येतात. त्यामुळे घरात एकंदर आनंदी वातावरण असते. बऱ्याच दिवसांनी एकमेकांना भेटल्यामुळे सगळे खूश असतात. फोटो काढणे, सेल्फी, एकत्र जेवणे आणि आजकालच्या काळामध्ये एक अविभाज्य भाग बनलेली गोष्ट म्हणजे रील बनवणे. रक्षा बंधनानिम्मित अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि तिच्या बहिणीने नुकताच एक डान्स रील बनवून आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘वन लव’ या इंग्लिश गाण्यावर त्या दोघींनी हा व्हिडिओ बनवला आहे.

तेजस्विनी ब्राइट पॅरेट ग्रीन कलरचा टी शर्ट घातला आहे तर तिच्या बहिणीने ब्राइट पिंक कलरचा टी शर्ट घातला आहे. आणि ह्या लूक मध्ये दोघीही एकदम चाइल्डिश, फनी, हॅपनिंग, उत्साही आणि आनंदी दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर काही क्षणाच्या अवधीतच प्रचंड व्हायरल झालेला आहे. आणि चाहतेदेखील या व्हिडिओवर भरभरून आपल्या प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

https://www.instagram.com/reel/CS8lakpoBul/?utm_source=ig_web_copy_link

समांतर टू या वेबसीरिजमध्ये तेजस्विनी पंडित नुकतीच दिसली होती. या सीरिजमध्ये जरी थोडा स्क्रीन टाईम तिला मिळाला असला तरी सुद्धा तिने आपल्या अभिनयाने आपली एक वेगळी छाप या सीरिजमध्ये निर्माण केली होती. अगं बाई अरेच्चा या चित्रपटामधून तेजस्विनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर आलेल्या बऱ्याच सिनेमांमध्ये तिने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. मागे ती ‘ये रे ये रे पैसा’ या सिनेमामध्ये दिसली होती. त्यानंतर मात्र कोणाच्याही सिनेमात तेजस्विनी दिसली नाही. पण तिने आपले सारे लक्ष्य वेबसीरिजवर केंद्रित केले आहे. एका महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये ती एका वेबसीरिजमध्ये दिसून येणार आहे, असे सूत्रांकडून कळले आहे.