दहा सिनेमे ज्या सिनेमांच्या बॉक्स ऑफिस वरील तिकीटांच्या विक्रीचा विक्रम आजवर इतर कोणत्याही सिनेमाने मोडलेला नाहीये.

भारतीयांचे आणि सिनेमाचे नाते काही वेगळेच आहे. काही वर्षांपूर्वी फक्त शुक्रवारीच सिनेमा प्रदर्शित व्हायचा. शुक्रवारी सिनेमा पाहण्यासाठी आठवड्याआधीच पैशांची जुळवाजुळव करण्यापासून ते सिनेमा पाहायला जाताना कोणता नवा ड्रेस घालायचा, पॉपकॉर्न घ्यायचे की वडापाव खायचा? असं काहीबाही ठरवत अनेकजण सिनेमांच्या प्रदर्शनाची वाट पाहत असायचे. पण आता काळ बदलला आहे. आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित होतात. इथे पॉपकॉर्नची, वडापावची किंवा काचेच्या बाटलीतील कोकची कशाचीही ओढ नसते. हवा असतो तो एक लॅपटॉप आणि वायफाय कनेक्शन. बस्स. चला तर पाहूया असे दहा सिनेमे ज्या सिनेमांच्या बॉक्स ऑफिस वरील तिकीटांच्या विक्रीचा विक्रम आजवर इतर कोणत्याही सिनेमाने मोडलेला नाहीये.

१. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे : शाहरुख खान, काजोल यांची प्रमुख भूमिका असणारा हा सिनेमा प्रदर्शनानंतरही अनेक वर्ष मुंबईतील चित्रपटगृहामध्ये चालू होता. आजवर ४,८०,८९,००० इतकी तिकिटे या सिनेमाची विकली गेली आहेत.

२. हम आपके है कौन : सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांची प्रमुख भूमिका असणारा हा सिनेमा प्रचंड हिट ठरला होता. हा फॅमिली ड्रामा प्रेक्षकांना खूपच आवडला होता. त्याचप्रमाणे सिनेमातील गाण्याने प्रेक्षकांना अक्षरश वेड लावले होते. या सिनेमाची ७,३९,६७,००० इतकी तिकिटे विकली गेली होती.

३. शोले : ‘बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना’ हा डायलॉग तर तुम्ही ऐकलाच असेल. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया बच्चन यांची प्रमुख भूमिका असणार हा एक क्लासिक सिनेमा आहे. या सिनेमाची  ५,५२,३४,००० इतकी तिकिटे विकली गेली होती.

४. बाहुबली : प्रभास, अनुष्का शेट्टी, राणा डुग्गुबाती यांची प्रमुख भूमिका असणारा हा सिनेमा आजवरचा भारतातील सर्वात जास्त फेमस आणि हिट ठरलेला आणि सर्वोच्च कमाई केलेला सिनेमा आहे. या सिनेमाची एकूण  ५,४०,४३,००० तिकिटे विकली गेली होती.

५. गदर : अमिषा पटेल आणि सनी देओल यांची प्रमुख भूमिका असणारा हा सिनेमा भारत पाकिस्तान यांच्या फाळणी दरम्यानच्या एका प्रेमकथेवर आधारित सिनेमा होता. या सिनेमाची एकूण ५,०९,५४,००० इतकी तिकिटे विकली गेली होती.

६. राजा हिंदुस्थानी : करिश्मा कपूर आणि आमीर खान यांची प्रमुख भूमिका असणारा हा सिनेमा एक सुपरहिट सिनेमा आहे. या सिनेमाची ४,०९,५६,००० इतकी तिकिटे विकली गेली होती.

७. बजरंगी भाईजान : मुन्नी आणि भोळाभाबडा बजरंगी भाईजान तुम्हाला आठवत असेलच. सलमान खानची प्रमुख भूमिका असणारा हा सिनेमा एक सुपरडुपरहिट सिनेमा आहे. या सिनेमाची एकूण ३,५४,१२,००० इतकी तिकिटे विकली गेली होती.

८. कुछ कुछ होता है : ‘राहुल नाम तो सुना होगा’ हा फेमस डायलॉग ज्या सिनेमातला आहे तो सिनेमा म्हणजेच ‘कुछ कुछ होता है’ हा सिनेमा होय. शाहरुख खान, राणी मुखर्जी, काजोल यांची प्रमुख भूमिका असणारा हा सिनेमा करण जोहरने दिग्दर्शित केला होता. या सिनेमाची एकूण ३,५६,११,००० इतकी तिकिटे विकली गेली होती.

९. दंगल : ‘म्हारी छोरिया छोरो से कम है के?’ हा डायलॉग आमिर खानच्या दंगल सिनेमातील आहे. हा डायलॉग आणि हा सिनेमा खूपच प्रसिद्ध झाला होता. या सिनेमाची एकूण ३,६९,३२,००० इतकी तिकिटे विकली गेली होती.

१०. बॉर्डर : देश भक्तीवर आधारित हा सिनेमा बॉलिवूडच्या इतिहासातील एक सर्वोत्तम सिनेमा आहे. ह्या सिनेमाची एकूण ३,७०,२१,००० इतकी तिकिटे विकली गेली होती.