नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच परिणीति चोप्राला बसला झटका; ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ फिल्म थिएटरऐवजी गेली ‘ओटीटी’वर / फोटो इन्स्टाग्रामवरून साभार

नव्या वर्षाच्या निमित्ताने काही कलाकारांनी आपल्या नव्या चित्रपटांची घोषणा केली. हे चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार असले तरी ते थिएटरमध्ये प्रद्रर्शित होणार की ‘ओटीटी’वर याबाबत अद्याप काही स्पष्ट करण्यात आलेले नाही. तर दुसरीकडे रूपेरी पडद्यावर परतण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या अभिनेत्री परिणीति चोप्राला तिचा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा असताना मोठा झटका बसला. तिचा हा चित्रपट आता ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार हे निश्चित झाले आहे. या पूर्वी ‘जबरिया जोडी’ या 2019 च्या ऑगस्टमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात ती शेवटची दिसली होती.

बॉलीवूडमधील अनेक मोठ्या स्टारप्रमाणेच परिणीति चोप्रा हिच्यासाठीदेखील वर्ष 2020 रिकामेच गेले. ‘लॉकडाउन’मुळे थिएटर बंद असल्याने या मागील वर्षी तिचा कोणताच चित्रपट प्रदर्शित झाला नाही. दिवाकर बॅनर्जी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘संदीप और पिंकी फरार’ हा तिचा चित्रपटही तयार असून याच कारणाने प्रदर्शित होऊ शकला नाही. ‘यशराज फिल्म्स’च्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटात तिच्यासोबत अर्जुन कपूर आहे. तर आता 2021 मध्ये रिभु दासगुप्ता यांचे दिग्दर्शन असलेला ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याची परिणीतिला अपेक्षा होती. या निमित्ताने पुन्हा रूपेरी पडद्यावर पुन्हा परतण्याची तिला आशा होती मात्र तिला मोठा झटका बसला.

परिणीतिचा हा चित्रपट थिएटरमध्ये नाही तर ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या चित्रपटाची एक झलक बुधवारी समोर आली आणि त्यासोबतच ही फिल्म आता ‘ओटीटी’वर येणार असल्याची सूचनाही आली. वास्तविक ‘रिलायन्स एन्टरटेन्मेंट’ने हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यासाठी बनविला होता. पण थिएटर बंद असल्याकारणाने निर्माते फिल्मच्या ‘कॉस्ट ऑफ मनी’वरील वाढणाऱ्या व्याजाचा भार सहन करू शकत नसल्याने त्यांनी चित्रपट ‘ओटीटी’वर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. आता 26 फेब्रुवारी रोजी या चित्रपटाचा प्रिमियर ‘नेटफ्लिक्स’वर होणार आहे.

पॉला हॉकिंग्ज यांच्या ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ या थ्रिलर कादंबरीवर यापूर्वी हॉलीवूडमध्येही एक चित्रपट बनला असून परिणीतिचा कादंबरीच्याच नावाचा चित्रपट तयार झाला असून यात ती मीरा ही भूमिका साकारत आहे. मीरा रोज ट्रेनने प्रवास करताना अशा लोकांभा भेटते जे खुश दिसतात. त्यांना पाहून तीही खुश होते. पण एकदिवस अचानक कळतनकळत एका गूढ हत्येमध्ये गुंतली जाते. त्यानंतर पुढे काय होते, हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

the girl on the train parineeti chopra starrer film will release on ott