बॉलिवूड कलाकार (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

सन २०२० मध्ये कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमुळे अनेक महिने सिनेमागृह बंद होते. अशात अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, अक्षय कुमार यासारखे अनेक कलाकार डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळाले होते. मात्र, यावर्षी सिनेमागृह सुरु असतानाही अनेक कलाकार या ओटीटीच्या माध्यमातूनच आपल्या  अभिनयाची जादू दाखवणार (These Bollywood Artists Will Seen On OTT Platforms In 2021) आहेत. चला तर जाणून घेऊया कोण आहेत हे कलाकार.

१. सैफ अली खान

अभिनेता सैफ अली खानने ‘सेक्रेड गेम्स’मध्ये सरताजची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला फारच पसंती देण्यात आली होती. तर आता सैफ ‘तांडव’ या वेबसीरीजद्वारे पुन्हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर परतणार आहे. हा एक पॉलिटिकल ड्रामा असून यामध्ये अनेक मोठे नेते दिसणार आहेत. सैफशिवाय यामध्ये डिंपल कपाडिया, गौहर खान, सुनील ग्रोवर, डिनो मोरिया यासारखे अनेक कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अली अब्बास जफरची ही सीरिज १५ जानेवारी रोजी अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.

२. प्रियंका चोप्रा

देसी गर्ल प्रियंका चोप्रा २०१९ मध्ये आलेल्या ‘द स्काय इज पिंक’ नंतर लवकरच ‘व्हाईट टायगर’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट न्यूयॉर्क टाईम्सच्या ‘बेस्ट सेलिंग बुक’ वर आधारित आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांद्वारे खूप पसंती दर्शवण्यात येत असून २२ जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रियंकासोबत राजकुमार राव आणि आदर्श गौरवसुद्धा मुख्य भूमिकेत आहेत.

३. मनोज वाजपेयी

अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या ‘द फॅमिली मॅन’ या सीरीजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. पहिला भाग यशस्वी झाल्यानंतर प्रेक्षक दुसऱ्या भागासाठी आतुरतेने वाट पाहत होते. तर प्रेक्षकांची ही आतुरता फ्रेब्रुवारीमध्ये संपणार आहे. १२ फेब्रुवारी रोजी अमेझॉन प्राईम वर ‘द फॅमिली मॅन’ चा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. यामध्ये मनोज, श्रीकांत तिवारी नावाच्या भूमिकेत आहेत जो राष्ट्रीय शोध पथकाच्या एका विशेष सेलचा एजेंट असतो. राज निदिमोरू आणि कृष्ण डीके यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.

४. कोंकणा सेन शर्मा

‘डॉली किट्टी और वो चमकते सितारे’ आणि ‘रामप्रसाद की तेरहवी’ नंतर कोंकणा सेन शर्मा यावर्षी प्रदर्शित होणाऱ्या ‘मुंबई डायरिज २६/११’ मध्ये दिसणार आहे. ही सीरीज सत्य घटनेवर आधारित आहे. यामध्ये कोंकणासोबत मोहित रैना, टीना देसाई आणि श्रेया धन्वंतरी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यामध्ये डॉक्टर, नर्स, पॅरा मेडिकल आणि रूग्णालयाचे स्टाफ यांची कथा दाखवण्यात येणार आहे. निखिल अडवाणी या सीरिजची निर्मिती आणि दिग्दर्शन करीत आहेत. अमेझॉन प्राईम व्हिडिओवर ही सीरीज प्रदर्शित करण्यात येणार आहे.

५. अभिषेक बच्चन

सन २०२० साली प्रदर्शित झालेल्या ‘ब्रीद : इनटू द शॅडोज’ नंतर अभिषेक बच्चन लवकरच याच्या तिसऱ्या भागात दिसणार आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या दरम्यान अमेझॉन प्राईमवर ही सीरीज प्रदर्शित करण्यात येणार आहे.

६. अरशद वारसी

‘असूर’चा पहिला भाग यशस्वी झाल्यानंतर अरशद वारसी पुन्हा यावर्षी डिजिटल प्लॅटफॉर्मवर परतणार आहे. असूरचा दूसरा सीझन यावर्षी सप्टेंबरमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. मार्चमध्ये याच्या चित्रीकरणास सुरुवात होणार असून यामध्ये अरशदसोबत वरून सोबतीसुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

७. कपिल शर्मा

बॉलिवूडचा कॉमेडी किंग कपिल शर्मा लवकरच डिजिटल डेब्यू करणार आहे. कपिलची पहिली डिजिटल सीरीज ‘दादी की शादी’ यावर्षी जुलैमध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या याचे चित्रीकरण सुरु असून सोनी लिववर ही सीरीज प्रदर्शित करण्यात येणार आहे.

८. सिद्धार्थ शुक्ला

‘बिग बॉस १३’ चा विजेता सिद्धार्थ शुक्लाने ‘हंम्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. तर आता सिद्धार्थ लवकरच ‘ब्रोकन बट ब्यूटिफूल’ या सीरीजद्वारे डिजिटल डेब्यू करणार आहे. सध्या याचे चित्रीकरण सुरु असून फेब्रुवारीमध्ये ही सीरीज प्रदर्शित करण्यात येणार आहे.