अभिनेता टायगर श्रॉफ (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार )

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ ओळखला जातो तो आपल्या फिटनेससाठी. चित्रपटांमध्ये टायगरच्या अ‍ॅक्शन सीन्स आणि नृत्याला प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळते. पण त्याचा एक व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहून असे म्हणता येईल की टायगर फक्त फिटनेस, अ‍ॅक्शन सीन्स किंवा नृत्यातच माहीर नसून खेळातसुद्धा तितकाच पारंगत आहे.

या व्हिडीओमध्ये टायगर फुटबॉल खेळताना दिसतोय. यात तो गोल वर गोल करत आहे. हा व्हिडिओ पाहता असे लक्षात येते  की टायगरसाठी गोल करणे डाव्या हाताचा खेळ आहे. टायगर श्रॉफने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ जरी जुना असला तरी टायगरच्या चाहत्यांना तो खूप आवडलेला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ जवळपास १८ लाख वेळा पहिला गेलाय.

या आधी टायगरने आपल्या व्यायामाचा जुना व्हिडीओ शेअर केला होता. त्याचा व्यायामाचा अंदाज पाहून चाहते थक्क झाले होते. टायगरचा हा व्हिडिओ चाहते पुन्हा पुन्हा बघत असल्याचे समजते.

टायगरचा बागी ३ हा चित्रपट या वर्षी प्रदर्शित झाला होता. यात त्याचा बरोबर श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत झळकली होती. अकॅशन आणि  रोमान्सने नटलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता, पण कोरोना संकटाचा परिणाम या चित्रपटावर झाला. इतकेच नाही तर हृतिक रोशन सोबतचा टायगरचा ‘वॉर’ हा चित्रपटही सुपरहिट झाला होता. या चित्रपटात पहिल्यांदाच हृतिक रोशनसोबत त्याची जोडी प्रेक्षकांनी पाहिली.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *