पावसाची सगळीकडेच रेलचेल चालू असताना मुंबईतील रस्त्यांवरून भर पावसात उस्ताद राशीद खान यांचे 'आवोगे जब तुम ओ साजणा' ऐकणे यासारखा आनंद नाही.

आणि डॉ काशिनाथ घाणेकर या सिनेमामधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री वैदेही परशुरामी तरूणांच्या काळजाची धडकन आहे. वैदेही इंस्टाग्रामवर बरीच सक्रिय असते. वैदेही आपले बरेच फोटो इन्स्टाग्रामवरून आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या फोटोंवर नेहमीच तिचे चाहते लाइक आणि कमेंट करुन प्रेमाचा वर्षाव करत असतात.

वैदेहीने नुकताच आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. पावसाची सगळीकडेच रेलचेल चालू असताना मुंबईतील रस्त्यांवरून भर पावसात उस्ताद राशीद खान यांचे ‘आओगे जब तुम ओ साजना’ ऐकणे यासारखा आनंद नाही. जब वी मेट मधील या गाण्याची जादू पावसामध्ये आपला आंनद द्विगुणित करतेच करते. मूड ऑफ द डे हे कॅप्शन देत वैदेहीने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

आदिनाथ कोठारे सहकलाकार असणाऱ्या ‘वेड लावी जीवा’ या सिनेमातून तिने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर आलेल्या वृंदावन, कोकणस्थ या सिनेमांमध्ये देखील ती दिसली होती. २०१६ साली आलेल्या अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘वजीर’ या हिंदी सिनेमांमध्ये देखील तिने एक छोटा रोल प्ले केला होता. त्याचप्रमाणे अलीकडेच आलेल्या रणवीर सिंग, सारा अली खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या, रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ या सिनेमामध्ये देखील ती एका महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसली होती. आणि डॉ काशिनाथ घाणेकर या सिनेमासाठी मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर तसेच युथफुल फेस ऑफ द इयर हे झी चॅनेलकडून दिले जाणारे दोन पुरस्कार तिला मिळाले होते.

https://www.instagram.com/reel/CRp3dHujTE-/?utm_source=ig_web_copy_link