अभिनेता वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल (फोटो सोशलमीडियावरुन साभार)

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल यांच्या लग्नाबाबतची चर्चा मागील वर्षापासून होत आहे. नुकतीच त्यांच्या लग्नाबाबतची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही पुढील महिन्यात अलिबागमध्ये लग्न करणार आहेत. विशेष म्हणजे या लग्नाकरता त्यांच्या कुटुंबियांनी अलिबागमध्ये एक फाईव्ह स्टार हॉटेल बुक केले आहे. या लग्नसोहळ्यात २०० लोकांनाच आमंत्रित केले जाणार आहे. वरुण आणि नताशा मागील वर्षात मे महिन्यातच विवाहबंधनात अडकणार होते, मात्र कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे त्यांचे लग्न लांबणीवर पडले होते. आता हे दोघे लवकरच बोहल्यावर चढणार असल्याची माहिती मिळतेयं.

२०१९ पासून त्यांच्या लग्नाची सुरुयं तयारी – वरुणने २०१८ मध्ये त्याची बालपणीची मैत्रीण असलेल्या नताशा दलालसोबतचे त्याचे नाते ऑफिशिअलरित्या जाहीर केले होते. या दोघांनी ही २ वर्षांपूर्वीच त्यांच्या लग्नाची तयारी सुरु केली होती. पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार वरुण धवनने नुकतेच अलिबागमध्ये एक फाईव्ह स्टार हॉटेलचे बुकिंग केल्याचे सांगितले आहे. मागील काही दिवसांपूर्वी वरुणने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्याने सांगितले होते की, तो या नव्या वर्षात किंवा जितक्या लवकर शक्य होईल तितके लवकर तो लग्न करणार आहे. २०१९ च्या मे महिन्यातच हे कपल विवाहबंधनात अडकणार होते मात्र, कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे त्यांनी त्यांचे लग्न पोस्टपॉंड केले होते.

कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास नुकताच काही दिवसांपूर्वी वरुण आणि अभिनेत्री सारा अली खानचा ‘कुली नंबर १’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला लोकांचा फारसा प्रतिसाद जरी मिळाला नसला, तरी यातील वरुणच्या अॅक्शन सीन्सची मजा नेटकऱ्यांनी चांगलीच घेतली होती. या चित्रपटातील वरुणचे अनेक मिम्स शेअर करण्यात आले होते. यासोबत वरुण त्याच्या ‘जुग जुग जियो’, ‘इक्कीस’ या आगामी चित्रपटांच्या तयारीमध्ये व्यस्त आहे.