बॉलीवूडमधील बहुतेक अभिनेत्रींचे बीचवरील बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि त्यामुळे अभिनेत्री चर्चेत असतात. पण बॉलीवूडमधील एका अभिनेत्रीने बीचवर साडी नेसून केलेल्या जबरदस्त स्टंटमुळे ती सध्या चर्चेत आहे. या अभिनेत्रीची साडीतील ही अदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली असून तिच्या या स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिच्या या अदावर यूजर फिदा झाले आहेत.
साडी नेसून बीचवर जबरदस्त स्टंट करणाऱ्या या अभिनेत्रीचे नाव आहे अदा शर्मा. ही अभिनेत्री चित्रपटांत कमी दिसत असली तरी सोशल मीडियावर खूपच एक्टिव्ह असते. यापूर्वी चाहत्यांसाठी तिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता तिने आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामुळे तिने चाहत्यांनाही आश्चर्यचकित केले आहे. साडीतील तिचा स्टंट पाहून चाहते तिच्यावर कौतुकाचा आणि प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
अदा शर्माने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती गुलाबी रंगाच्या साडीमध्ये आणि ग्रे रंगाच्या ब्लाउजमध्ये दिसते. साडी नेसलेली अदा बीचवर जबरदस्त कार्टव्हील करताना दिसते. तिचा हा स्टंट पाहून चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले. साडी नेसून कार्टव्हील करतानाचा तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. तिची ही अदा चाहत्यांचा खूपच भावली असून चाहते तिच्या या अदेवर फिदा झाले आहेत. बॉलीवूडमध्ये फारसे यश मिळवू न शकलेली ही अभिनेत्री आता दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळली आहे.
अदा शर्मा हिने ‘1920’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला फारसे यश मिळाले नसले तरी त्यातील अदाच्या अभिनयाचे मात्र कौतुक झाले होते. आत्म्याने पछाडलेल्या एका मुलीची भूमिका तिने या फिल्ममध्ये साकारली होती. तसेच परिणीति चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याबरोबर ‘हंसी तो फंसी’ या चित्रपटात ती दिसली होती. हा चित्रपटही फारशी कमाल दाखवू शकला नव्हता. तर, विद्युत जामवालसोबत तिने ‘कमांडो 3’ हा चित्रपटही केला होता.