‘कोरोना’पासून बचावाच्या टिप्स देणारा बॉबी देओलचा मजेशीर व्हिडीओ झाला व्हायरल / फोटो इन्स्टाग्रामवरून साभार

सध्या जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचे संक्रमण वाढू लागले असून त्याबाबतचे निर्वंध अधिक कडक करण्यात आले आहेत. 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका परदेशी चित्रपटात कोरोनासारखीच परिस्थिती दाखविण्यात आली होती. त्या चित्रपटाची मध्यंतरी खूपच चर्चा झाली. त्यानंतर आता एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता बॉबी देओल कोरोनापासून बचावासाठी खबरदारीचे उपाय सांगताना दिसतो. अर्थात हा व्हिडीओ त्याच्या काही चित्रपटांतील क्लिप्स जोडून तयार करण्यात आला आहे. पण या व्हिडीओमुळे यूजरने खूपच मनोरंजन होत असून हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

निर्माता दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या ‘आश्रम’ या वेबसिरीजच्या माध्यमातून बॉबी देओल याने डिजिटल प्लॅटफॉर्मवर डेब्यू केला. बॉबी गेल्या काही वर्षांत कोणत्याही नव्या चित्रपटात दिसला नव्हता. त्यानंतर आश्रमच्या माध्यमातून बॉबी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याची ‘काशिपूरवाले बाबा निराला’ची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली. त्याच्या भूमिकेचे कौतुकही झाले. या सिरीजमुळे चर्चेत असतानाच आता सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. बॉबी देओलच्या ‘करीब’, ‘दिल्लगी’, ‘बिच्छू’, ‘और प्यार हो गया’ या चित्रपटांतील काही क्लिप जोडून हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ चर्चेत आहे.

‘द इंडियन मीम्स’ यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो क्यू टिपच्या मदतीने पीसीआर चाचणी करताना, सोशल डिस्टन्सिंगबाबत सांगताना आणि एकमेकांपासून लांब राहण्याचे सांगताना दिसतो. या व्हिडीओसोबत त्यांनी लिहिले की, ‘लॉर्ड बॉबी यांनी कोविडपासून सुरक्षा आणि खबरदारीबाबत आधीच सांगितले होते. अर्थात हे थोडे विनोदी आहे. पण बॉबी कोरोनाकाळातील सर्वांत महत्त्वाच्या गोष्टींबाबत खरच खूपच स्मार्टपणे सांगताना दिसतो.’

‘आश्रम’पासून डिजिटल डेब्यू करणाऱ्या बॉबीने नेटफ्लिक्सच्या ‘क्लास ऑफ 83’ या चित्रपटातही काम केले. आता ‘आश्रम’ सिरीजच्या तिसऱ्या सिझनची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. पहिल्या दोन सिझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

for years ago bobby deol prepared to escape from corona