अभिनेत्री विद्या बालन (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार )

तब्बल तीन महिन्यांनी शूटिंगचे पुन:श्च हरिओम करताना विद्या बालन खूप उत्साहित होती. तिला आनंद याचा आहे की जवळपास तीन महिन्यांनंतर सर्वजण आपल्या कामावर परतले आहेत. विद्या म्हणते की, “कोरोना संसर्गाच्या गांभीर्यामुळे शूटिंगच्या सेटवर सर्व प्रकारच्या सुरक्षेची व्यवस्था केली जात आहे. सेटवर आलेल्या प्रत्येकाचे शरीराचे तापमान तपासणे, सतत हात धुणे, सॅनिटायझर बाळगणे, अशा सगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत.”

विद्याने एका छोट्या युनिटसह मेहबूब स्टुडिओमध्ये जाहिरातीचे चित्रीकरण केले. हा अनुभव सांगताना विद्या म्हणाली, ” सेटवर परतल्यावर  खरोखरच खूप आनंद झाला. प्रत्येकजण पीपीई किटमध्ये होते. आम्ही सर्वजण नियमांचे काटेकोरपणे पालन करत होतो. संसर्ग टाळण्यासाठी आम्ही सर्व खबरदारी घेत होतो. आमच्यासाठी हा एक नवीन अनुभव होता.

ती असेही म्हणाली की, “आपल्या सर्वांना आता  ही परिस्थिती स्वीकारावी लागणार आहे आणि  हळूहळू या सोबतच पुढे जावे लागणार आहे. आपल्याला पूर्वीपेक्षा अधिक जबाबदार आणि सतर्क असणे गरजेचे आहे आणि कोरोना बरोबर काम करण्याची सवय लावून घ्यावी लागणार आहे.”  विद्या अशी आशा करते की सर्वकाही पूर्ववत झाल्यानंतरही लोक आपल्या आरोग्याची काळजी अशीच घेतील. आपल्या कामाविषयी विचारल्यावर विद्या म्हणाली, “मी बर्‍याच दिवसांपासून कामाबद्दल विचार करत होते. ‘शेरनी’ चित्रपटाचे शूटिंग कधी सुरू होईल ते मला माहिती नाही, पण आताची परिस्थिती पाहता शूटिंग पावसाळ्यानंतरच  शक्य होईल.”  विद्या घरूनच आपल्या आगामी  ‘शकुंतला देवी’ या चित्रपटाचे प्रमोशन करणार असल्याचे ही समजते.

आपल्याला माहितीच आहे की काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार देखील जाहिरातीच्या शूटिंग करता घरा बाहेर पडला होता. या वरून आपल्याला असे समजते की बॉलिवूडची गाडी आता तीन महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर पुन्हा रुळावर येत आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *