प्रभू सिंहच्या भूमिकेसाठी मला दर्जेदार अभिनय करणारा अभिनेता पाहिजे होता, कारण ही चित्रपटातील सर्वात महत्वाची व्यक्तिरेखा आहे. विवेकने यासारख्या सिनेमात कधीच अभिनय केलेला नाही, त्याच्या चाहत्यांसाठी त्याला या व्यक्तिरेखेत बघणे ही एक पर्वणीच असणार आहे.(फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार )

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय आपल्या आगामी चित्रपट ‘ईति: कॅन यु सॉल्व्ह युअर ओन मर्डर’ मध्ये ‘प्रभू सिंह’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. त्याने ट्विट द्वारे आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली. हा चित्रपट एक थरारपट असणार आहे, असे विवेकने आपल्या ट्विटमध्ये नमूद केले. त्याने आपल्या भूमिकेबद्दल फारसे बोलणे टाळले.

विशाल मिश्रा यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. विशाल या चित्रपटाविषयी बोलताना म्हणाला की, प्रभू सिंहच्या भूमिकेसाठी मला दर्जेदार अभिनय करणारा अभिनेता पाहिजे होता, कारण ही चित्रपटातील सर्वात महत्वाची व्यक्तिरेखा आहे. पुढे तो म्हणाला की, विवेकने यासारख्या सिनेमात कधीच अभिनय केलेला नाही, त्याच्या चाहत्यांसाठी त्याला या व्यक्तिरेखेत बघणे ही एक पर्वणीच असणार आहे.

 

या चित्रपटाविषयीची आणखी एक खास गोष्ट म्हणजे याला राजेश रोशन संगीतबद्ध करणार आहेत. विवेकने ट्विट करून या बद्दल माहिती दिली. विवेक आपल्या ट्विटमध्ये असे म्हणाला आहे की, मला सांगायला अभिमान वाटतो की दिग्गज संगीतकार राजेश रोशन या चित्रपटाचे संगीत करणार आहेत. धन्यवाद सर, आमच्यासाठी हे केल्याबद्दल. आपल्यासोबत काम करण्यास आम्ही सर्वजण उत्सुक आहोत!

तीन वर्षांच्या ब्रेकनंतर राजेश पुन्हा संगीत क्षेत्रात कमबॅक करणार आहेत. ‘काबिल’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटाद्वारे सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन हा देखील सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.

२०२१ च्या सुरूवातीस हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘मंदिरा एन्टरटेन्मेंट’ व विवेक ओबेरॉयच्या ‘ओबेरॉय मेगा एंटरटेन्मेंटने’ केली आहे. थोडक्यात काय, तर या सगळ्या गोष्टींमुळे हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *