OTT Movies Web Series : नेट्फ्लिक्स, ऍमेझॉन आणि डिज्नी प्लस हॉटस्टार यांसारखे ओटीटी प्लॅटफॉर्म आपल्या प्रेक्षकांसाठी उत्तमोत्तम सिनेमे, वेब सीरिज आणि शो घेऊन येत आहेत.

सलमान खानचा बहुचर्चित सिनेमा राधेसह ’वंडर वुमन १९८४’ अशा वेगवेगळ्या वेब सीरिज आणि सिनेमे या महिन्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. कोरोनाच्या या महाभयंकर काळात मनोरंजनासाठी थिएटर गाठणे अवघड आहेच पण त्यात संकोचाचीही भावना असते. तुम्हालाही असंच काहीसं वाटत असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. नेट्फ्लिक्स, ऍमेझॉन आणि डिज्नी प्लस हॉटस्टार यांसारखे ओटीटी प्लॅटफॉर्म आपल्या प्रेक्षकांसाठी उत्तमोत्तम सिनेमे, वेब सीरिज आणि शो घेऊन येत आहेत. पाहूया अशीच काही आगामी नावं.

लावा का धावा

रीलिज-५ मे

लाव्हा का धावा हे फ्लोर इज लाव्हा या शोचे हिंदी रुपांतर आहे. या शोबद्दल विशेष सांगायचं तर ’तकेशीज कॅसल’ या तुफान लोकप्रिय गेम शोनंतर अभिनेता जावेद जाफरी त्याच्या खास ढंगात मजेदार कॉमेंट्री करत प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करणार आहे.

रामयुग

[नेटफ्लिक्स]- ६ मे

कलाकार- दिगंध मनचले, अक्षय डोगरा, ऐश्वर्या ओझा, दुहान सिंग, विवान भटेना, नवदीप पन्नापोले, अनिश जॉन

कुणाल कोहली दिग्दर्शित ही वेब सीरिज, रामयुग, दि. ६ मेपासून नेटफ्लिक्सवर रीलिज होण्याच्या तयारीत आहे. यामध्ये रामायणाची कथा पाहायला मिळेल.

माईलस्टॊन

[नेटफ्लिक्स]- रीलिज-७ मे

कलाकार- लक्षवीर सरण, सुविंदर विक्की

हा सिनेमा एका ट्रक ड्रायव्हरच्या कथेवर बेतलेला आहे. सिनेमात दाखवलंय की एकट्याच राहणाऱ्या या ड्रायव्हरची नोकरी एका छोट्या मुलामुळे धोक्यात येते. ईवान अय्यरने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

हम भी अकेले तुम भी अकेले

[डिज्ने प्लस हॉटस्टार] ९ मे

बॉलीवूड अभिनेत्री झरीन खान आणि अंशुमन झा या कलाकारांची ही फिल्म हम भी अकेले तुम भी अकेले एका रोड ट्रिपवर आधारित आहे. सिनेमात झरीन एका लेस्बियनची तर अंशुमन एक गे व्यक्तिरेखा साकारणार आहेत. फर्स्ट रे फिल्म्सची निर्मिती असलेल्य़ा या सिनेमाचे दिग्दर्शन हरीष व्यास यांनी केले आहे.

राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई

[जी प्लेक्स]- १३ मे

कलाकार- सलमान खान, दिशा पटानी, रणदीप हुडा

खूप दिवसांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर आता सलमान खानचा हा सिनेमा राधे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. येत्या १३ मे रोजी. ईदच्या निमित्ताने हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म्ससह थिएटरमध्येही हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. सलमानसोबत या सिनेमात दिशा पटानी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुडा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सिनेमाचा ट्रेलर रीलिज झाला असून प्रेक्षकानी त्याला पसंती दर्शवली आहे.

अल्मा मॅटर- इनसाईड द आयआयटी ड्रीम

[नेट्फ्लिक्स] १४ मे

कलाकार- बिस्वा कल्याण रथ

आयआयटी खरगपूरच्या कॅम्पसमध्ये घडणारी ही एक डॉक्युमेंट्रीच असेल. कॅम्पसच्या आत घडणारी गोष्ट यात पाहायला मिळेल. आयआयटीसाठी देशातला हा सर्वोत्तम कॅम्पस मानला जातो. बिस्वा या संस्थेतल्या विद्यार्थ्याची कहाणी प्रेक्षकांना दाखवणार आहे.

वंडर वुमन १९८४

[ऍमेझॉन प्राईम व्हिडिओ]- १५ मे

कलाकार- गल गडोट, क्रिस्टन विग, ख्रिस पाईन

पहिल्या सुपरहिरोची फ्रॅंचायजी वंडर वुमन १९८४ १६ डिसेंबर २०२० मध्ये रीलिज झाली होती. आता हाच सिनेमा ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर रीलिज होणार आहे.

सरदार का ग्रॅंडसन

[नेटफ्लिक्स] १८ मे

कलाकार- अर्जुन कपूर, रकुल प्रीत सिंग

अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंग यांचा सरदार का ग्रॅंडसन हा कॉमेडी ड्रामा असलेला सिनेमा नेटफ्लिक्सवर रीलिज होणार आहे. आपल्या आजीसाठी एक नातू त्याच्या सगळ्या कुटुंबाला कसा पाकिस्तानातून भारतात घेऊन येतो, ही गोष्ट या सिनेमात पाहायला मिळेल. सिनेमात अर्जुन आणि रकुलशिवाय जॉन अब्राहम आणि अदिती राव हैदरी हे दोघेही आहेत.