जेव्हा शाहरुख गमतीत म्हणाला होता, पैशाचे काय, तो तर आता मी शिंकलो तरी लोक देतात’ / फोटो इन्स्टाग्रामवरून साभार

बॉलिवूडमध्ये अभिनयामुळे आणि मेहनतीने स्वतःचे वेगळे स्थान आणि ओळख निर्माण करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये किंग खान शाहरुखचे नाव घ्यावे लागते. त्याने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. सध्या तो त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ‘झिरो’ चित्रपटाच्या अपयशानंतर तब्बल अडीच वर्षांनी शाहरुख पुन्हा सेटवर परतला. अडीच वर्षांत त्याचा एकही चित्रपट आला नसला तरी तो चर्चेत होता. सेलिब्रिटी असल्याने त्याच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होते, अगदी त्याच्या शिंकण्याचीही आणि यामुळे त्याला पैसाही मिळतो. एकदा पैशांबाबत गमतीने तो म्हणाला होता की, ‘पैशाचे काय, तो तर आता मी शिंकलो तरी लोक देतात.’
शाहरुख ‘पठाण’ फिल्मच्या शूटिंगसाठी सेटवर परतल्यापासून चर्चेत आहे. यशराज फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली असून यात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. ही फिल्म निर्मिती अवस्थेपासूनच चर्चेत असून प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेक विक्रम मोडीत काढत आहे. या चित्रपटातून आपल्या कमबॅकसाठी शाहरुख जास्त मानधन घेत असून त्याने 100 कोटी रुपये घेतल्याचेही सांगितले जात आहे. यामुळे तो भारतातील सर्वांत जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक झाला आहे. शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये निर्माण केलेली स्वतंत्र ओळख आणि स्थान यामुळेच तो सध्या एवढे मानधन घेत आहे.

त्याने जगभरात अनेक कॉन्सर्ट आणि फंक्शनलाही हजेरी लावली आहे. त्याबद्दल त्याला मोठी रक्कमही मिळाली आहे. यासंदर्भात एकदा एका मुलाखतीत शाहरुखला जेव्हा विचारले गेले की, तो कॉन्सर्ट आणि फंक्शनच्या निमित्तानं जगभरात फिरतो त्यामागे केवळ पैसा कमावण्याचा उद्देश आहे का? यावर मजेशीर उत्तर देताना शाहरुखने सांगितले होते की, ‘नाही, तसे काही नाही. कारण पैशाचे काय, तो तर आता मी शिंकलो तरी लोक देतात.’

शाहरुखने डेब्यू चित्रपटापासूनच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली असून त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंतीही मिळते. त्याच्या नव्या चित्रपटाबाबत नेहमीच उत्सुकता असते. सध्या त्याच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे.

if i sneeze people give money to me said shahrukh khan