Govinda and Shilpa Shetty movies: गोविंदा आणि शिल्पा ह्यांनी १९९४ मध्ये आग ह्या सिनेमात सर्वात प्रथम काम केले होते.

सुपर डान्सर सिझन ४ च्या सेटवरून रोज नवीन बातम्या येत आहेत. आप के आ जाने से ह्या गाण्यावर गोविंदा आणि नीलम ह्यांनी एकाच रंगमंचावर २० वर्षांनी डान्स केला. हा डान्स सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे. गोविंदाने आजवर एकूण १६५ सिनेमात काम केले आहे. त्यांचे जवळपास सर्वच सिनेमे हिट झाले होते. पण काही सिनेमे मात्र साफ फ्लॉप झाले. पण त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी एका अभिनेत्री सोबत सहा सिनेमात काम केले. पण दुर्दैवाने म्हणा की काय, ते सहाच्या सहा सिनेमे बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे आपटले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही अभिनेत्री कोण? तर ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सुपर डान्सर सिजन ४ ची परीक्षक शिल्पा शेट्टी आहे.

ही आठवण गोविंदानी जेव्हा प्रेक्षकांसोबत शेअर केली तेव्हा शिल्पा शेट्टीने हासत दोन्ही हातांनी आपला चेहरा लपवला. शिल्पा म्हणाली की, आम्ही सोबत काम केलेले ६ सिनेमे जरी फ्लॉप झाले असले तरी त्या सर्वाच्या सर्व सिनेमातील गाणी सुपर हिट झाली होती.

गोविंदा आणि शिल्पा ह्यांनी १९९४ मध्ये आग ह्या सिनेमात सर्वात प्रथम काम केले होते. १९९५ मध्ये त्यांनी हथकडी आणि गॅम्बलर ह्या सिनेमात काम केले. त्यानंतर १९९६ मध्ये छोटे सरकार आणि परदेसी बाबू ह्या सिनेमात काम केले. आणि हेच ते ६ सिनेमे पूर्णपणे बॉक्स ऑफिसवर आपटले होते. रिऍलिटी शो मध्ये जेव्हा असे जुने अभिनेते अभिनेत्री भेटतात तेव्हा जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो.