अमिताभ बच्चन यांनी शेअर केला १९७९ सालचा फोटो (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियाद्वारे नेहमीच चाहत्यांचे मन वळवण्यात आपल्याकडे आकर्षित करत असतात. याद्वारे ते नेहमी अनेक पोस्ट शेअर करत असतात. यामध्ये कधी कधी ते त्यांचे न पाहिलेले फोटो शेअर करत असतात. मंगळवारी त्यांनी त्यांचा असाच एक जुना फोटो शेअर केला (Amitabh Bachchan Shared Hrithik Roshan’s 1979 Childhood Photo) आहे. यामध्ये अभिनेता ह्रतिक रोशनचा बालपणीचा फोटो दिसत आहे.

अमिताभ यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये अमिताभ बच्चन आणि राजेश रोशन यांच्याशिवाय दोन मुले दिसून येत आहेत. यामध्ये एक मुलगा ह्रतिक रोशन आहे. या फोटोसोबत त्यांनी लिहिले की, ‘मिस्टर नटवरलाल चित्रपटातील ‘मेरे पास आओ’ हे पहिलं गाणं मी गायलं होतं. संगीत दिग्दर्शक राजेश रोशनसोबत संगीताचा सराव करताना. यादरम्यान बेंचवर मांडी घालून बसलेला जो मुलगा दिसत आहे तो ह्रतिक रोशन आहे’.

राजेश रोशन ह्रतिकचे काका आहेत. १९७९ साली आलेला अमिताभ यांचा ‘मिस्टर नटवरलाल’ हा चित्रपट त्यांच्या सुपरहिट चित्रपटापैकी एक आहे. यामध्ये अमिताभ बच्चनसोबत रेखा, कादर खान आणि अमजद खानसुद्धा मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाला राजेश रोशन यांनी संगीत दिले होते. ह्रतिक आणि अमिताभ यांच्याबाबत बोलायचे झाल्यास त्या दोघांनी ‘कभी खुशी कभी गम’ आणि ‘लक्ष्य’ यासारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास अमिताभ बच्चन लवकरच ‘ब्रम्हास्त्र’, ‘झुंड’ आणि ‘चेहरे’ यासारख्या चित्रपटात दिसणार आहेत. तर ह्रतिक रोशनने नुकतेच ‘फायटर’ या त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. यामध्ये दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे.