बऱ्याच कलाकारांनी आपले स्वत:चे रेस्टॉरंट चालू केले आहे. चला तर पाहूया, कोणकोणते कलाकार आहेत ज्यांनी स्वत:चे रेस्टॉरंट चालू केले आहे आणि त्यातून ते बरेच पैसेही कमावतात.

बॉलीवूडमधील बरेच कलाकार अभिनय क्षेत्राबरोबरच बिझनेसच्या क्षेत्रामध्ये देखील आपले नशीब आजमावतात. अभिनय क्षेत्र हे एक अस्थिर क्षेत्र आहे. आज तुमच्याकडे काम असेल तर उद्या तुमच्याकडे काम नसेलही. त्यामुळे बरेचसे कलाकार आपले साइड बिझनेस चालू करण्यावर भर देतात. बऱ्याच कलाकारांनी आपले स्वत:चे रेस्तराँ चालू केले आहे. काही कलाकार रिअल इस्टेटमध्ये आपले पैसे गुंतवतात तर काही कलाकार इतर बऱ्याच बिझनेसमध्ये आपले पैसे गुंतवतात. चला तर पाहूया, कोणकोणते कलाकार आहेत ज्यांनी स्वत:चे रेस्टॉरंट चालू केले आहे आणि त्यातून ते बरेच पैसेही कमावतात.

अर्जुन रामपाल : बॉलीवूडचा हॉट, सेक्सी, हंक एक उत्कृष्ट अभिनेता म्हणजे अर्जुन रामपाल होय. दिल्लीमध्ये त्याचे स्वतःचे एक लक्झरी रेस्तराँ आहे. लैप लॉज असे त्याचे नाव आहे. तिथे एक डिस्कोदेखील आहे. दिल्लीमधील सर्वात चांगल्या रेस्तराँपैकी एक म्ह्णून ह्या रेस्तराँला ओळखले जाते.

सुनील शेट्टी : सुनील शेट्टी सध्या चित्रपटांमध्ये काम करत नसला तरी त्याने बरेच मोठे मोठे बिझनेस चालू केलेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे रेस्तराँ. मुंबईमध्ये त्यांचे मिस शेफ डायनिंग नावाचे एक रेस्तराँ आहे. इथे लोक जेवायला तर येतातच त्याचबरोबर वॉटर स्पोर्ट्स हे तेथील मुख्य आकर्षण आहे. त्याचबरोबर सुनील शेट्टी अनेक क्लब आणि बारचा मालक आहे.

सुष्मिता सेन : माजी विश्वसुंदरी सुष्मिता सेन सध्या चित्रपटांमध्ये काम करत नाही. मागे हॉटस्टारवर रिलीज झालेली तिची आर्या ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. सुष्मिता सेनने मुंबईमध्ये बंगाकी मौसीज नावाचे एक रेस्तराँ चालू केले आहे. मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना बंगाली फूडचा आस्वाद घेता यावा यासाठी तिने हे रेस्तराँ चालू केले होते.

बॉबी देओल : धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबी देओल याचे दोन रेस्तराँ आहेत. मुंबईमध्ये ‘सम प्लस एल्स’ नावाचे रेस्तराँ अंधेरीमध्ये आहे. इथे इंडियन आणि चायनीज फूड अतिशय उत्कृष्ट मिळते. त्याचप्रमाणे सुहाना नावाचे आणखी एक रेस्तराँ त्याच्या मालकीचे आहे. तिथे भारतीय जेवण मिळते.

 

सोहेल खान : सलमान खानचा भाऊ सोहेल खान देखील एका रेस्तराँचा मालक आहे. रॉयल्टी क्लब नावाच्या रेस्तराँचा तो मालक आहे. हे क्लब कम रेस्तराँ या आधी शिल्पा शेट्टीच्या मालकीचे होते. १०,००० स्क्वेअर फूट इतकी या रेस्तराँची जागा आहे. वन ऑफ दी बेस्ट इंटरनॅशनल नाइट क्लब्सच्या A यादीमध्ये रॉयल्टी क्लबचा समावेश आहे.

प्रियांका चोप्रा : देसी गर्ल प्रियांका चोप्राने निक जोनस सोबत विवाह केला आणि ती अमेरिकेतच स्थायिक झाली. पण अमेरिकेमध्ये राहून देखील तिला भारतीय खाण्याची आठवण येत असावी म्हणूनच तिने सोना नावाचे एक रेस्तराँ न्यूयॉर्कमध्ये चालू केले. भारतीय, पंजाबी अशा सर्व प्रकारचे भारतीय जेवण तिथे मिळते.

नागार्जुन : साऊथ सुपरस्टार नागार्जुन देखील एका हॉटेलचे मालक आहेत. हैदराबादमधील सर्वात लॅव्हिश एरिया म्हणजेच ज्युबिली हिल्स. एन ग्रील वाई नागार्जुन असे त्यांच्या या हॉटेलचे नाव आहे. इथे इटालियन जेवण अतिशय उत्कृष्ट मिळते.

दिनो मोरिया : राज सिनेमातील हिरो दिनो मोरिया सध्या चित्रपटांमध्ये सक्रिय नसला तरी त्याचे बरेच बिझनेस त्याने चालू केलेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे रेस्तराँचा. क्रिप स्टेशन नावाची कॅफेची चेन मुंबईमध्ये आहे. इथे युरोपियन जेवण अतिशय उत्कृष्ट मिळते.