आता या गाण्याच्या दोन बाजू आहेत. एक रेकॉर्डिंगची तर एक शूटिंगची!

हा फोटो पाहताक्षणीच तुम्ही गुणगुणायला नक्कीच लागले असाल, ‘तनहा तनहा यहां पे जीना ये कोई बात है’… रामगोपाल वर्मा दिग्दर्शित ‘रंगिला’ला (१९९५) तब्बल २५ वर्षे झाली हे पुन्हा वेगळे सांगायला नकोच. पण आजही हे गाणे तेवढेच टवटवीत, फोर्सफूल आहे.

आजच्या ग्लोबल युगातील रसिकांचेही ते आवडीचे आहे यातच सगळे आले.  या गाण्याच्या दोन बाजू आहेत. एक रेकॉर्डिंगची तर एक शूटिंगची! यानिमित्ताने आशा भोसले यांना  चित्रपटासाठी गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या बदललेल्या पद्धतीचा अनुभव आला. त्या या चित्रपटातील एका गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी म्हणून  चेन्नई (तेव्हाचे मद्रास) येथे गेल्या. रेकॉर्डिंग स्टुडिओत पोहोचल्यावर त्यांच्या लक्षात आले की, एकही वादक हजर नाही. असे कसे झाले? गाण्याचे रेकॉर्डिंग म्हणजे अनेक प्रकारच्या वादयांसह वादकांचा प्रचंड ताफा हवा. त्यांना इतकीच सूचना मिळाली की हे गाणे अशा अशा पद्धतीने (मूडने/स्टाईलने)  गायचे आहे.

‘एक नवीन अनुभव’ असे मानत त्या गायल्या आणि मुंबईत येऊन आपल्या कामात रमल्या. काही दिवसांनी ‘रंगीला’ गाण्याची ध्वनिफीत प्रकाशित झाली आणि आशाजींनी  गायलेले तेच  गाणे त्यांनी ऐकले आणि त्या अवाक् झाल्या. त्या गाण्यावरचा संगीत साझ आणि त्याची उच्च तांत्रिक मूल्ये ‘ऐकून’ त्या गुणगूणू लागल्या. तनहा तनहा यहां पे जीना…

कंगनाने नाव न घेता जया बच्चन यांच्यावर साधला निशाणा; म्हणाली, बॉलिवूडच्या थाळीने मला… 

उर्मिला मातोंडकर या चित्रपटाच्या थीमपासूनच त्यात इन्व्हॉल्व असल्याने पटकथेत कोणते गाणे कधी आहे, कसे आहे, का आहे आणि ते कसे साकारायचेय याची तिला पूर्ण कल्पना असल्याने या गाण्यातील बोल्डपणा आकर्षक कसा राहिल, त्यासाठी आपल्याला मानसिक तयारी कशी करायला हवी, मेकअप कसा हवा, पडद्यावर ते कसे दिसेल याची पूर्वकल्पना होती. एक मेहनती व्यावसायिक अभिनेत्री म्हणून हे सगळे माहिती असणे गरजेचे आहे असेच तिचे मत आजही आहे. एखादे गाणे भारी लोकप्रिय ठरते त्याची जडण घडण अथवा प्रवास कसा वेगवेगळ्या प्रकारे सुरु असतो ना!

  • स्पॉटबॉय