आता शाहरूख आणि जुही चावला जोडी म्हटल्यावर राजू बन गया जंटलमन, यस बॉस, राम जाने, फिर भी दिल है हिन्दुस्तानी हे चित्रपट अगदी सहज आठवले असतीलच.

शाहरूख खान हा कार्पोरेट युगातील खरा बिझनेस माईंडेड स्टार अॅक्टर! खरंतर एखाद्या क्षेत्रात यशस्वी कसे व्हावे यासाठी या एसआरकेच्या यशोगाथेचा अभ्यास केला तरी उत्तम. तो नट म्हणूनच आला आणि…. आणि… आणि… असे बरेच आणि आहेत. असाच एक आणि म्हणजे त्याने जुही चावलाला आपलं बिझनेस पार्टनर केलं.

आता शाहरूख आणि जुही चावला जोडी म्हटल्यावर राजू बन गया जंटलमन, यस बॉस, राम जाने, फिर भी दिल है हिन्दुस्तानी  हे चित्रपट अगदी सहज आठवले असतीलच. तसाच एक चित्रपट होता, यश चोप्रा दिग्दर्शित ‘डर’. त्यात सनी देओल आणि जुही चावला पती पत्नीच्या  भूमिकेत होते आणि शाहरूखचे जुही चावलावर एकतर्फी प्रेम असते. क… क… किरण असे विक्षिप्तपणे म्हणतच तो तिला त्रास देत असतो. कदाचित आजच्या पिढीला पटणार नाही पण असा शाहरूख जुहीसोबत आपण ‘तू मेरे सामने, मै तेरे सामने ‘ या गाण्याचे स्वप्न पाहतो त्या गाण्याला पब्लिक थिएटर डोक्यावर घेत. याच जुहीसोबत त्याने दिग्दर्शक अझिझ मिर्झा यांनाही घेतले आणि ड्रीम्स अनलिमिटेड हा चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली, तीच ती रेड चिली म्हणून ओळखली जाते.

लेटेस्ट न्यूजसाठी पाहा…

या तिघांनी मिळून ‘फिर भी दिल है हिन्दुस्तानी’ ( २०००) या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. तरी सहजी हार मानेल तो शाहरूख कसला? त्याने आपले पार्टनर बदलले, म्हणजे काय केले माहितीये? आपली पत्नी गौरी खान हिला जोडीला घेऊन आपली कंपनी विकसित केली आणि आजही ती कार्यरत आहे.

काहीही असो, एसआरके आपल्या नायिकांसोबत फक्त पडद्यावरच जोडी जमवतो असे नाही तर तो त्यांच्याशी छान दोस्ती जमवतो आणि असेही काही साध्य करतो, एव्हाना तुमच्या डोळ्यासमोर आयपीएलमधील कोलकत्ता नाईट रायडर्स  टीम नक्कीच आली असेलच.

जुहीचा पती जय मेहता उद्योजक आहे आणि कुठे गुंतवणूक करायची हे त्याला तर नक्कीच चांगल्या प्रकारे माहिती असणार. शाहरूखच्या दूरदृष्टीला काही दाद द्याल की नाही? सिनेमा आणि क्रिकेटची मिलावट करावी तर त्यानेच. आणि पडद्यावरचे नाते प्रत्यक्षातही घट्ट कसे करावे हे शिकावे ते त्याच्याकडूनच! सिनेमात काम करताना तो आजूबाजूला किती आणि कसा पाहतोय हेही यात दिसतेय बघा.

  • स्पॉटबॉय