नागार्जुन आणि तब्बू एकमेकांच्या प्रेमात असे बुडून गेले होते की त्यांना एकमेकांशिवाय राहाणं अवघड झालं होतं.

बॉलीवूडच्या निवडक बुद्धिमान अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी एक आहे सुंदर चेहरा आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व लाभलेली अभिनेत्री तब्बू. तब्बूला तिच्या उत्तम अभिनयासाठी ओळखलं जातं. हीच गोष्ट दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन याची. एकेकाळी तब्बू आणि नागार्जुन एकेमेकांच्या प्रेमात बुडून गेले होते. नागार्जुन अभिनेत्री अमलासोबत विवाहित होता. तरीही तब्बू आणि नागार्जुन यांच्यात प्रेम फुलत राहिलं. दोघांच्या प्रेमाचे किस्से कायम चर्चेत असत.

रूपेरी पडद्यावर प्रेमाचे प्रसंग रंगवताना बहुतेक वेळा बॉलीवूड स्टार्स त्यांच्या सहकलाकाराच्या प्रेमात पडतात. या जोड्यांच्या प्रेमाची चर्चाही भरपूर होते. पण बहुतांश वेळा अनेक वर्षं प्रेमसंबंध असूनही त्यांना शेवटी ब्रेकअपचा निर्णय घ्यावा लागतो. असंच काहीसं घडलं तब्बू आणि नागार्जुन यांच्या बाबतीत. सुमारे दहा वर्षं एकमेकांसोबत राहिल्यानंतर ते दोघं वेगळे झाले.

तब्बूला प्रेमात नेहेमीच असफलतेला सामोरं जावं लागलं आहे. नागार्जुन अक्किनेनी याच्या प्रेमात ती वेडी झाली होती आणि नागार्जुनसुद्धा तिच्या प्रेमात गुंग होता. दहा वर्षं या दोघांचं अफेअर सुरू होतं. मात्र त्या दोघांनी त्यांच्यातल्या नात्याविषयी कधी खुलेपणाने वक्तव्य केलं नाही. खूपसे सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम, फिल्मी पार्ट्या अशा ठिकाणी हे दोघे एकत्र दिसत असत.

निन्ने पेलादाता या सिनेमाच्या सेटवर तब्बू आणि नागार्जुन यांची पहिली भेट झाली होती. ही भेट अगदी व्यावसायिक कामाच्या संदर्भातच होती. पण हळूहळू ते दोघं जवळ येऊ लागले होते. असं म्हणतात की त्यांचं अफेअर सुरू झालं तेव्हा सुरूवातीला नागार्जुनची बायको अभिनेत्री अमला हिला या प्रकरणाबाबत काही कल्पना नव्हती. पण यथावकाश त्यांच्यातलं प्रेम बहरत गेलं तसतशी ही खबर पसरत गेली.

नागार्जुन आणि तब्बू एकमेकांच्या प्रेमात असे बुडून गेले होते की त्यांना एकमेकांशिवाय राहाणं अवघड झालं होतं. नागार्जुनला भेटण्यासाठी तब्बू नेहमी हैदराबादला जात असे आणि बरेचदा नागार्जुनही तब्बूकडे मूंबईमध्ये येत असे. एवढंच नव्हे तर नागार्जुनचा जास्तीत जास्त सहवास मिळावा म्हणून तब्बूने हैदराबादमधे एक घर विकत घेतलं होतं. नागार्जुनचं तब्बूवर असीम प्रेम होतं मात्र त्याला त्याच्या बायकोलाही सोडायचं नव्हतं. ह्याच कारणामुळे तब्बू नागार्जुनपासून वेगळी झाली.  २०१२ साली त्यांचा ब्रेकअप झाला होता.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नागार्जुनने सांगितलं होतं की तब्बू नेहमीच त्याची ’सुंदर मैत्रीण’ असेल. त्याने तब्बू स्वत:ची बेस्ट फ्रेंड असल्याचंही सांगितलं होतं. एवढंच नव्हे तर नागार्जुनची बायको अमला अक्किनेनी हिने नागार्जुन आणि तब्बूच्या नातेसंबंधाबाबत मत दिलं होतं. ती म्हणाली होती की तब्बू आणि तिच नवरा एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. मात्र तब्बूने कधी स्वत:च्या प्रेम किंवा ब्रेकअपबाबत कधीही वाच्यता केली नाही. तिच्या चाह्त्यांना खात्री वाटते की नागार्जुनमुळेच तिने अजूनही कोणाशी लग्न केलेलं नाही.