वयाप्रमाणे प्रत्येकाचे रंगरूप बदलतेच. पण आपल्याला आवडणारे आपले लाडके अभिनेते आणि अभिनेत्री तसेच सुंदर दिसत राहावेत असे चाहत्यांना वाटत असते.

‘पर प्रेमग्रंथ के पंनो पर अपनी तकदीर तो झिरो है’ असं म्हणणारा जॅकी श्रॉफ आणि ‘दिवनोमें ना कोई आमिर होता है ना कोई गरीब होता है’ म्हणणाऱ्या मीनाक्षीने नव्वदच्या दशकात आपल्या सौदर्यांने लोकांना अक्षरशः घायाळ केलं होतं. इतकी सुंदरता, इतका उत्कृष्ट डान्स करणारी आणि अभिनय कौशल्यात देखील उत्कृष्ट असलेली मीनाक्षीने मोजकेच चित्रपट केले पण हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटविण्यात ती यशस्वी झाली. तसं पाहायला गेलं तर हिरो या सिनेमामुळे तिला एक वेगळी ओळख मिळाली. हा सिनेमा तिच्या कारकिर्दीतला पहिला सिनेमा नव्हता तर १९९३ साली प्रदर्शित झालेला पेंटर बाबू हा तिचा पहिला सिनेमा होता.

मीनाक्षी शेषाद्री मूळची तामिळनाडूची. मीनाक्षीचा जन्म झारखंडमध्ये झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९९१ साली तिने मिस इंडिया कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला आणि त्याच्या नंतर तिने अभिनयक्षेत्रात आपले नशीब आजमावले. ८० आणि ९० च्या दशकात मीनाक्षीने एकापेक्षा एक सरस अशा सिनेमांमध्ये काम केले. घातक, घायल, दामिनी या सिनेमांमुळे तिला एक वेगळी ओळख मिळाली होती. सिनेमामधील अभिनयामुळेच नाही तर तिच्या सौंदर्याचे देखील बरेच चाहते होते.

अशा ह्या सुंदर अभिनेत्रीने लग्नानंतर आपल्या परिवारासोबत पूर्णवेळ व्यतित करण्याचे ठरवले. त्यामुळे लग्नानंतर तिने फक्त दोन ते तीन सिनेमांमध्ये काम केले. सोशल मीडियावरदेखील मीनाक्षी अधूनमधून ऍक्टिव्ह असते. आपले फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. पण तिच्यामध्ये झालेला हा अमूलाग्र बदल पाहून तिच्या चाहत्यांना हीच का ती हिरो सिनेमातली मीनाक्षी असा प्रश्नदेखील पडतो. मीनाक्षी म्हटलं की लोकांना डोळ्यासमोर उभी राहते ती ‘जब कोई बात बिगड जाये, जब कोई मुश्कील पड जाये’ या गाण्यातली मीनाक्षी, तसेच नागिन मधली मीनाक्षी.

वयाप्रमाणे प्रत्येकाचे रंगरूप बदलतेच. पण आपल्याला आवडणारे आपले लाडके अभिनेते आणि अभिनेत्री तसेच सुंदर दिसत राहावेत असे चाहत्यांना वाटत असते. म्हणूनच बऱ्याच वर्षांनी आपल्या लाडक्या कलाकाराचे फोटो पाहिले की चाहते आश्चर्यचकीत होत असतात.