अभिनेत्री दीपिका पादुकोण (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

दीपिका पदुकोण ही बॉलिवूडची राणी आहे. फक्त सिनेमांमध्ये राणीचा रोल प्ले केला म्हणून तिला राणी म्हटलं जातं असं अजिबात नाहीये. तर ज्या पद्धतीने तिने आपले करियर घडवले आहे, ज्या पद्धतीने ती स्वतःला कॅरी करते, ज्या पद्धतीने ती पब्लिकमध्ये आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पाडते ह्या सगळ्या गोष्टी आपोआप तिच्या भोवती रॉयल वलय निर्माण करतात.

एक काळ असा होता, जेव्हा तिला हाऊसफुल सारख्या सिनेमात इतर कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करावी लागली होती. पण त्यानंतर आलेल्या कॉकटेल, ये जवानी है दिवानी, बाजीराव मस्तानी, रामलीला, पदमावत, पिकू ह्या सिनेमांच्या सलग यशामुळे तिला बॉलिवूडची आणि बॉक्स ऑफिसची राणी म्हणून ओळख निर्माण करून दिली. ह्या सिनेमांच्या यशानंतर दीपिकाला अनेक सिनेमांच्या ऑफर आल्या होत्या. पण बिझी वेळापत्रकामुळे तिला बऱ्याच सिनेमांना नकार द्यावा लागला होता. चला तर पाहूया ते सिनेमे कोणते होते.

१. प्रेम रतन धन पायो : सलमान खान आणि राजश्री प्रॉडक्शनने मिळून अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. पुन्हा एकदा सलमान खानला घेऊन राजश्री प्रॉडकशन हाऊसला घेऊन प्रेम रतन धन पायो हा सिनेमा बनवायचा होता. आणि ह्या सिनेमासाठी दीपिकाला लीड अभिनेत्री म्हणून कास्ट करण्याचा निर्मात्यांचा विचार होता. पण तिच्या बिझी वेळापत्रकामुळे तिला हा सिनेमा करता आला नाही. नंतर सोनम कपूरला तिच्या जागी कास्ट केले गेले.

२. शुद्धी : करण जोहरच्या शुद्धी ह्या सिनेमातही सलमान आणि दीपिका एकत्र दिसण्याचा योग आला असता. पण ह्या सिनेमात सलमान ऐवजी वरूण धवनला घेण्यात आले. आणि पुन्हा एकदा बिझी वेळापत्रकामुळे दीपिकाला हा सिनेमा देखील सोडावा लागला होता. करीना कपूर आता हा रोल करणार आहे.

३. फास्ट अँड फ्युरियस भाग ७ : विन डिझेल सोबत ट्रिपल एक्स ह्या सिनेमातून दीपिकाने हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तुम्हाला माहीत आहे का? ह्या सिनेमाच्या आधीच आलेल्या फास्ट अँड फ्युरियस भाग ७ ह्या सिनेमात दीपिकाला पाहायला मिळाले असते. पण तारखा जुळून न आल्याने तिला हा सिनेमा देखील करता आला न्हवता.

४.  धूम ३ :  अमीर खान आणि कॅटरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला धूम थ्री हा सिनेमा आधी दीपिकाला ऑफर झाला होता. पण तारखा जुळून न आल्याने हा सिनेमा नंतर कॅटरिना कैफला मिळाला. जर दीपिका ह्या सिनेमात असती तर कमली कमली ह्या गाण्यावर थिरकताना आज कतरीना नाही तर दीपिका दिसली असती.