Shahid Kapoor Family : सुप्रिया यांनी शाहिदची बायको मीरा हिचंही खूप कौतुक केलं आहे. मुलांचं पालन-पोषण, सांभाळ या सगळ्या जबाबदाऱ्या ती छान प्रकारे निभावत आहे.

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरची सावत्र आई अभिनेत्री सुप्रिया पाठकने शाहिद आणि त्याच्या कुटुंबातील सगळ्यांशी असलेल्या नात्यांविषयी आपलं मन मोकळं केलं आहे. शाहिद हा सुप्रियाचे पती पंकज कपूर यांचा मुलगा आहे. सुप्रिया यांनी शाहिदची बायको मीरा आणि त्यांच्या दोन मुलींबाबत भाष्य केलं आहे. सुप्रिया यांच्या म्हणण्यानुसार, शाहिद आणि त्यांच्यातलं नातं आई-मुलाच्या नात्याहूनही आधिक जवळचं आणि समंजस आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की त्या शाहिदला पहिल्यांदाच भेटल्या, तेव्हा तो सहा वर्षांचा होता.

सुप्रिया यांनी पिंकव्हिलाशी बोलताना सांगितलं की, आम्ही दोघं एकमेकांना मित्रासारखे भेटलो. मी त्याच्या वडिलांची मैत्रीण होते. आणि पुढेही हे नातं असंच राहिलं आहे कारण आम्ही कधी एकत्र राहिलो नाही. शाहिद पहिल्यापासूनच एक अशी व्यक्ती आहे, ज्याच्यावर मी विसंबून राहू शकते. माझं त्याच्यावर खरोखरच प्रेम आहे. त्या म्हणाल्या की त्यांच्यातल्या नात्याला शब्दबद्ध करणं अवघड आहे. आणि तसं करण्याची त्यांची इच्छाही नाही. पण पुढे त्यांनी सांगितलं आहे की, त्यांचा शाहिदवर पूर्ण विश्वास आहे. दोन्ही नातवंडांबद्दल त्यांनी सांगितलं की मिशा आणि जैन ही शाहिदची दोन्ही मुलं अतिशय अद्भूत आहेत आणि त्यांना ती फार प्रिय आहेत.

सुप्रिया यांनी शाहिदची बायको मीरा हिचंही खूप कौतुक केलं आहे. मुलांचं पालन-पोषण, सांभाळ या सगळ्या जबाबदाऱ्या ती छान प्रकारे निभावत आहे. ती सून असल्यासारखं त्या तिच्याशी वागत नाहीत. तिची एखाद्या लेकीसारखी वागणूक असते, एकत्र फिरायला, शॉपिंगला, लंच-डिनरसाठी जायला आम्ही उत्सुक असतो, असं त्यांचं म्हणणं आहे.

शाहिदची आई अभिनेत्री नीलिमा खट्टर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की पंकज कपूर आणि त्यांचं लग्न अयशस्वी ठरलं. त्यांचे दुसरे पती राजेश खट्टर यांच्याशी झालेल्या घ्टस्फोटाबद्दलही वाच्यता केली.  त्या म्हणाल्या की पहिलं लग्न मोडलं तेव्हा घटस्फोटासाठी त्यांची मानसिक तयारी नव्हती. त्या धक्क्यातून सावरायला दीड-दोन वर्षं लागली. पण आपण सर्वसाधारण माणूस असून आपल्यालाही कोणीतरी नाकारू शकतं हा मोठा धडा मला मिळाला. श्री. खट्टर यांच्यासोबतचं वैवाहिक आयुष्य सावरता आलं असतं पण गोष्टी हाताबाहेर गेल्या होत्या असंही त्यांनी स्पष्ट केलं.