Kareena Kapoor Movies : 'मै अपनी फेवरीट हूं' असं म्हणत अभिनेत्री करिना कपूरने जब वी मेट मधून अख्या भारतीयांना भुरळ घातली होती, असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही.

‘मै अपनी फेवरीट हूं’ असं म्हणत अभिनेत्री करिना कपूरने जब वी मेट मधून अख्या भारतीयांना भुरळ घातली होती, असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. तुम्हाला वाटत असेल की जब वी मेट हा सिनेमा करिना कपूरच्या करिअरमधला उत्कृष्ट सिनेमा आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित आणि शाहिद कपूर आणि करिना कपूर मेन लीडमध्ये असलेल्या या सिनेमाचे तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड अशा बऱ्याच भाषांमध्ये रिमेक बनले गेले. त्यामुळे कुणालाही वाटेल की जब वी मेट हाच सिनेमा करिना कपूरच्या आयुष्यातील सर्वात जवळची मूव्ही आहे. पण असं नाहीये मित्रांनो.

करिना कपूरने १ जून रोजी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर वीरे दी वेडिंग या सिनेमाबद्दल एक स्टेटस शेअर केलं होतं. १ जून २०१८ रोजी प्रदर्शित झालेल्या वीरे दी वेडिंग हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. तसेच यातील काही दृश्यांमुळे तो वादाच्या भोवऱ्यात देखील अडकला होता. स्वरा भास्कर, करीना कपूर, सोनम कपूर आणि शिखा या चौघी यामध्ये मुख्य भूमिकेमध्ये होत्या. स्त्रियांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा होता. स्त्रिया, स्त्रियांचे वैयक्तिक आयुष्य, त्यांचे प्रोफेशनल आयुष्य यांच्याभोवती फिरणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता.

सोनम कपूरची बहीण रिया कपूरने या सिनेमाची निर्मिती केली होती. हा सिनेमा सोनम कपूरच्या लग्नाच्या आधी प्रदर्शित झाला होता. तसेच तैमुरच्या जन्मानंतरचा करिना कपूरचा हा पहिलाच सिनेमा होता. अशा बहू कारणांमुळे करिना कपूरला हा सिनेमा खूपच जवळचा वाटतो आणि तशी पोस्ट तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. the best desicion i took आणि what a cool film असेही तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे.

तुम्ही पाहिला आहे का वीरे दी वेडिंग हा सिनेमा? जर पाहिला असेल तर तुम्हाला तो कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा.